तत्कालीन प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव. एसीबी च्या जाळ्यात.


24 प्राईम न्यूज 5 Sep 2023 डॉ. देवराम किसन लांडे तत्कालीन प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव तथा तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, पाचोरा फी यांनी तकारदार यांचे कडुन ५०,०००/रु लाचेची मागणी केल्याने त्यांचे विरुध्द गुन्हा दाखल.
तकारदार हे चाळीसगाव ये
थील रहिवाशी आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी १५व्या वित्त आयोगा अंतर्गत तालुका स्तरावर आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी जागा भाडेतत्वावर घेण्याबाबत वर्तमानपत्रामध्ये जाहीरात प्रसिध्द केली होती. सदर जाहीरातीत चाळीसगाव तालुक्यात देखील भाडे तत्वावर जागा पाहीजे असल्याचे नमुद केले असल्याने तकारदार यांनी त्यांचे कैलास नगर, भडगाव रोड, चाळीसगाव येथील घर आरोग्य वर्धिनी केंद्राकरीता भाडेतत्वावर देणे करीता जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांच्याकडे अर्ज केला होता तेव्हा पासुन तकारदार हे डॉ. देवराम किसन लांडे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना भेटुन पाठपुरावा करुन त्यांच्या संपर्कात होते.
त्यानंतर तक्रारदार यांनी दि.२२.०६.२०२३ रोजी डॉ. देवराम किसन लांडे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट घेतली असता त्यांनी तकारदार यांच्याकडे त्यांचे चाळीसगाव येथील घर आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी देणेकरीता ५०,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याची तकारदार यांनी दुरध्वनीव्दारे माहीती दिली होती.
सदर माहीती वरुन धुळे ला.प्र. विभागाचे पथकाने चाळीसगाव येथे जावुन तकारदार यांना भेटुन त्यांची तकार घेतली होती. सदर तकारीची दि.२२.०६.२०२३ रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान डॉ. देवराम किसन लांडे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी त्यांचे शशिकला नगर, हिरापुर रोड, चाळीसगाव येथील राहते घरी पंचासमक्ष तकारदार यांच्याकडे ५०,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे विरुध्द चाळीसगाव शहर पोस्टे जि.जळगाव येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्री. अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, गायत्री पाटील, मकरंद पाटील, रामदास बारेला व सुधीर मोरे या पथकाने केली आहे.
सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा. शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. माधव रेड्डी व वाचक पोलीस अधीक्षक मा. श्री. नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.