गुलजार आजमी यांना जमीअत उलमा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

जळगाव ( प्रतिनिधी )
मुंबई येथील एका दवाखान्यात वयाच्या 89 व्या वर्षी गुलजार आजमी यांचे देहांत झाले असून आज त्यांना जमियत उलमा जळगाव तर्फे श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
मदरसा अनवरुल उलूम येथे एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांना सर्व प्रथम मदरस्याचे विद्यार्थ्यांनी पवित्र कुराण पठण करून त्यांना आदरांजली सादर केली.
त्यानंतर मुफ्ती हारून नदवी यांनी त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकले,मुफ्ती अतिकउर रहमान यांनी त्यांच्या ६० वर्षांच्या कारकिर्दीची माहिती विशद केली.
करीम सालार यांनी श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या सारखा कायद्याचा पदवीधर नसताना कायदा वाचणारा व समजणारा चांगला नेता हरपला त्याबद्दल दुःख व्यक्त केले.
जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी ज्यांच्यावर देशद्रोहाचे किंवा इतर आरोप होतात त्या व्यक्तीचे नातेवाईक सुद्धा त्यांना सहकार्य करत नाही अशावेळी आझमी साहेब त्यांच्या पाठीशी उभे राहत व त्यांना कायदेशीर सल्ला व कायदेशीर बाब उपलब्ध करून देत असल्याची बाब निदर्शनास आणली.
कार्यक्रमात मुफ्ती हारून
नदवी, मुक्ती अफजल, हाफिज रहीम पटेल, कारी पटेल, कारी मुस्ताक, मौलाना अब्दुल रहमान, ईकराचे अध्यक्ष,करीम सालार, मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख आदींची उपस्थिती होती..