तुझे घर जाळून टाकेल,तुमची राख केल्या केल्या शिवाय राहनार नाही अशी धमकी देत घर पेटविणाऱ्यास सहा वर्ष कारावास..

अमळनेर ( प्रतिनिधि) चोपड़ा शहर पो.स्टे. गु.र.न. 392 / 2021 सत्र खटला केस नं. 40 / 2022, गुन्हा भा.द.वि कलम 436,448,427,342 मधील आरोपी देवेद्र पांडुरंग पाटील, उ. 4. 24 रा. मोरया नगरचाळीसगांव ता. चाळीसगांव, जि. जळगांव यांनी दिनांक 24/11/2021 रोजी पहाटे 04.00 वाजेच्या सुमारास फिर्यादी युवराज आधार पाटील रा. पाटील गडी चोपडा शहर यांचे घरी पुर्वीच्या बहीण पाहुण्याच्या वादावरुन झालेल्या वाद शहर पोलिस स्टेशनमध्ये सहमतीने मिटविल्यानंतर त्याचा राग डोक्यात घेतुन आरोपीने फिर्यादी व त्याचा मुलगा यास “तुझ्या पोरांना समजावून सांग” अशी धमकी देवुन प्रशांतथी गच्ची पकडुन लाथा मारल्या. तसेच देवेंद्र पाडुरंग पाटील याने देखील प्रशांत यास “तुला तिकडे पुण्याला बघतो. तुझी नोकरी संपवितो. तुझया घरच्यांनाही बघतो, तुम्ही येथे कसे राहतात से बघतो, तुझे घर जाळुन टाकेल, तुमची राख केल्या शिवाय राहणार नाही. अशी धमकी देवून बहिण व भावी यांना सोबत घेवुन चाळीसगांव येथे निघुन गेला. त्यानंतर दिनांक 24.11. -2021 रोजी पहाटे 04.00 वाजता फिर्यादी त्यांचे घरात झोपलेले असताना त्यांचे घराच्या पहिल्या मजल्यावरील उघडया गॅलरी द्वारे घरात प्रवेश केला व संपूर्ण घराच्या दरवाज्यावर पडदयावर लाकडी दांडक्यावर तसेच गॅस सिलेंडरवर व रुम मध्ये डिझेल सारखे ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले व घर जाळुन घराचे नुकसान केले व त्यावरुन फिर्यादीने आरोपी विरुद्ध वर नमुद कलमा प्रमाणे चोपड़ा शहर पोलिस स्टेशनला फिर्याद नोंदविली. सदर कामी मा. जिल्हा न्यायाधीश 1 श्री. पी. आर. चौधरी साहेब यांचेपुढे सदरच्या खटल्याचे कामकाज चालले त्यात सहा सरकारी वकील अॅड. किशोर आर. बागुल मंगरुळकर यांनी एकुण 09 साक्षीदार तपासले. पैकी फिर्यादी तसेच गल्लीतील सकाळच्या वेळेस प्रत्यक्ष दर्शी साक्षीदार तसेच सरकारी पंच व नॉडल ऑफिसर ज्यानी आरोपीताचे लोकेशन शोधले होते ते व शेजारील साक्षीदार यांची साक्ष महत्वाचे ठरले तपासी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक संतोष भागवत चव्हाण यांची साक्ष ग्राहय धरून आरोपीस सदरचा खटल्या कामी आलेल्या पुराव्या वरून गुन्हा सिध्द झालेने गुन्हा भा.द.वि कलम 436 प्रमाणे 6 वर्षे शिक्षा व रुपये 500 दंड व दंड न भरल्यास 15 दिवस शिक्षा तसेच 448 प्रमाणे दोन महिने शिक्षा व रुपये 100 दंड व दंड न भरल्यास 07 दिवस शिक्षा तसेच कलम 427प्रमाणे एक महिना शिक्षा तसेच कलम 342 प्रमाणे तीन महिने शिक्षा व रुपये 100 दंड व दंड – भरल्यास 07 दिवस शिक्षा अशी संपूर्ण शिक्षा एक प्रीतरित्या मोगावयाची आहे. या कामी पैरवी अधिकारी, सहा फौजदार उदयसिंग सांळुके व पो.हे.कॉ. हिरालाल पाटील, तसेच पो.कॉ. नितीन कापडणे, पो.ना. कॉ. अतुल पाटील भोपा शहर पोस्टे पो.कॉ. राहुल रणधीर पो.स्टे चोपडा ग्रामीण यांनी काम पाहीले.