मराठा समाजाने भव्य मोर्चा काढून निषेध व्यक्त करत दोषिवर निवेदनाद्वारे केली कार्यवाहीची मागणी.

अमळनेर ( प्रतिनिधि )जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे शांततेने आंदोलन करणाऱ्या मराठा समाज बांधवांवर झालेल्या अमानुष लाठी

माराचा मराठा समाजाने प्रांत कचेरीवर भव्य मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. बळीराजा चौकात काही वेळ ठिय्या आंदोलन केले. मोर्चात सुमारे ४०० ते ५०० समाजबांधव हजर होते.
६ रोजी सकाळी पावणे बारा वाजता कै सुंदरबाई दिनकरराव देशमुख मराठा मंगल कार्याल

यापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाच्या अग्रभागी महिलांनी जाहीर निषेधाचा फलक धरला होता. दोषींवर योग्य ती कारवाई सह मराठा आरक्षण मागणी मान्य करून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यात यावे याबाबत घोषणा देण्यात आल्या. बळीराजा चौकात मोर्चा आल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या मांडला. उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी बळीराजा चौकात येऊन आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. आंदोलकांची भूमिका वरीष्टांपर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिल्यानन्तर मोर्चाचे विसर्जन झाले.
माजी आमदार डॉ बी एस पाटील , मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील , मराठा महिला मंडळाच्या अध्यक्षा तिलोत्तमा पाटील , महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ , डॉ अनिल शिंदे , प्रा अशोक पवार , प्रा डॉ लीलाधर पाटील ,न्या गुलाबराव पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन पाटील , सचिव विक्रांत पाटील , कोषाध्यक्ष महेंद्र बोरसे ,उपाध्यक्ष संजय पाटील , संभाजी ब्रिगेड चे श्याम पाटील , मराठा सेवा संघाचे कैलास पाटील ,संजय पुनाजी पाटील , दर्शना पवार , तुषार बोरसे , गणेश भामरे , मनोज पाटील , विनोद कदम , माधुरी पाटील ,प्रा शिला पाटील , पद्मजा पाटील , प्रा श्याम पाटील , प्रा सुरेश पाटील , प्रा सुभाष पाटील , शिवसेनेचे श्रीकांत पाटील , विजय पाटील , आर जे पाटील , भूषण भदाणे , स्वप्नील पाटील ,आशिष पाटील , जितेंद्र देशमुख , जे पी पाटील ,अनंन्त निकम , बापूराव ठाकरे , सचिन वाघ ,दीपक काटे ,वैशाली शेवाळे , आशा शिंदे , कविता पवार , या मराठा बांधवांसाह प्रवीण जैन ,सुभाष चौधरी ,वसुंधरा लांडगे , प्रदीप अग्रवाल ,सुनील शिंपी ,सूरज परदेशी ,सनी गायकवाड , गोपाळ बडगुजर , पपु भावसार , बन्सीलाल भागवत,चेतन राजपूत आदी विविध समाजातील प्रतिनिधी देखील हजर होते.
निषेध मोर्चात काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (ठाकरे गट),शिवसेना (शिंदे गट) असे सर्व पक्षाचे मराठा समाजाचे पदाधिकारी हजर होते मात्र भाजप पदाधिकारी गैरहजर होते.
यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी चौकात टरबूज आणूंन जमिनीवर आपटले आणि त्याला लाथा मारल्या
यावेळी पोलीस निरीक्षक विजय शिंदे , सहा पो नि हरिदास बोचरे , पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ , पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.