जरांगे पाटलांची प्रकृती स्थिर, प्रशासनाचे लक्ष, उपोषणाला नऊ दिवस पूर्ण.

24 प्राईम न्यूज 7 Sep 2023
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला बुधवारी नऊ दिवस झाले आहेत. उपोषनादरम्यान जरांगे यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्याकडे प्रशासनाचे पूर्ण लक्ष आहे.
जरांगे यांना डिहायड्रेशन आहे आणि त्यांची क्रिएटिनिन पातळी थोडी जास्त आहे. आम्ही त्यांना इंट्राव्हेनस फ्लुइड्स देण्यास सुरुवात केली इलेक्ट्रोलाइट्स ठीक आहेत आणि त्याच्या हृदयाची गती देखील समाधानकारक आहे, असेही त्यांनी सांगितले.
जरंगे यांनी २९ ऑगस्टपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात उपोषण सुरू केले आहे. सरकारने आत्तापर्यंत दोन वेळा जरंगे यांच्याशी संपर्क साधून उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे, मात्र त्यांनी नकार दिला आहे. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे पथक नियमितपणे लक्ष ठेवून आहे.