मुख्यमंत्रीनी घेतला मोठा निर्णय,उपोषण मागे घेण्याचं केले आवाहन.

24 प्राईम न्यूज 7 Sep 2023 मराठवाडयातील मराठा समाजातील ज्या लोकांकडे निजामकाळातील महसुली, शैक्षणिक किंवा इतर नोंदी आहेत त्यांना कुणबी दाखले दिले जातील. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देता यावे, यासाठी अशा प्रकरणांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करणे व कार्यपद्धती निश्चित करण्याकरिता निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात येत आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मराठा समाजाला कुणबी दाखला मिळविण्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असला तरी सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबदध आहे, असेही ते म्हणाले. मनोज जरंगे पाटील यांनी त्यांचे उपोषण तात्काळ मागे घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.