पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांना आदरांजली !

0

एरंडोल ( कुंदन ठाकुर)भारतीय स्वातंत्र्यसेनानी, जहालमतवादी नेते ,शिक्षक, संपादक आणि लेखक तसेच ‘लोकमान्य’ या उपाधीने ज्यांचा उल्लेख केला जातो अश्या बाळ गंगाधर टिळक यांना जळगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कुल तर्फे आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी शाळेच्या समन्वयिका सौ.मेघना राजकोटीया यांनी नियोजित कार्यक्रमाची रूपरेषा मांडली शाळेच्या परिपाठाच्या वेळेत उपरोक्त कार्यक्रम घेण्यात आला. शाळेचे प्राचार्य गोकुळ महाजन यांच्या हस्ते लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. शाळेचे माध्यमिक विभागातील शिक्षक शेखर लांडगे यांनी आपल्या भाषणात टिळकांच्या जीवनकार्याला उजाळा देत त्यांना लोकमान्य हे नाव कसे मिळाले ही माहिती विद्यार्थ्यांना दिली. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच “ अशी गर्जना देत ब्रिटीशांच्या जुलमी सत्तेविरूद्ध संघर्षाला प्रारंभ केला. शिवजयंती आणि गणेशोत्सव या सार्वजनिक सणांद्वारे संघटीत राहण्यासाठी जागृत केले . उपस्थित विद्यार्थ्यांसमोर लोकमान्य टिळकांच्या प्रखर देशभक्तीचे वर्णन त्यांनी केले.

या प्रसंगी विराट राजेशिर्के (ई. ३ री ) या विद्यार्थ्याने आपल्या भाषणातून टिळकांच्या महान कार्याला व समर्पणाच्या भावनेला वंदन केले. टिळकांच्या जीवनातील विविध प्रसंग वर्णानातून विद्यार्थ्यांनी देशभक्तांसाठी दर्शविलेल्या आदर व सन्मानाची भावना अधिक बळकट झाली.

शाळेचे प्राचार्य गोकुळ महाजन यांनी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ठ सदरीकरणासाठी त्यांचे कौतुक केले.

शाळेचे उप-मुख्याध्यापक दिपक भावसार , पोदार जंबो किड्स च्या मुख्याध्यापिका सौ.उमा वाघ, वरिष्ठसमन्वयक हिरालाल गोराणे , शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!