न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दहीहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.

एरंडोल (कुंदन ठाकुर) एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दहीहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी प्रथम शाळेच्या प्रिन्सिपल सरला

वीचुरकर व्हाईस प्रिन्सिपल सरिता पाटील यांनी माता सरस्वती व श्रीकृष्ण भगवान राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले व कार्यक्रमाला सुरुवात केली चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगत आतून श्रीकृष्ण जन्म कथा सांगितल्या तसेच शाळेच्या प्रिन्सिपल यांनीही विद्यार्थ्यांना गोपाळकाला दहीहंडी व श्रीकृष्ण जन्माष्टमी याबद्दल कथा ऐकवल्या व महत्त्व सांगितले व त्यानंतर चौथीच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रम मोठ्या आनंदाने साजरा केला त्यात दहीहंडी फोडण्याचा मान चेतन ज्ञानेश्वर पाटील यांनी मिळवला यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते व शाळेतील विद्यार्थ्यांनी दांडिया खेळूनही आनंद साजरा केला तर संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी काबरे सर, सचिव श्रीकांतजी काबरे सर सहसचिव सागरजी मानूधने सर शाळेचे चेअरमन सिद्धेशजी महाजन सर व सर्व संचालक मंडळ यांनीही श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला बद्दल शुभेच्छा दिल्या व या कार्यक्रमाचे तयारी सांस्कृतिक विभाग शिक्षक कविता पाटील व आरती भेलसेकर यांनी केले तर सूत्रसंचालन आरती भेलसेकर व आभार कविता पाटील यांनी केले याप्रसंगी शाळेच्या प्रिन्सिपल व्हाईस प्रिन्सिपल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.