१९ वर्ष आतील हॉकी स्पर्धा
मुलींमध्ये बेंडाळे व बी झेड तर मुलांमध्ये अँग्लो व बियाणी विजयी

जळगाव ( प्रतिनिधी)
जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय व हॉकी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या १९ वर्षा आतील शालेय हॉकी स्पर्धेत मनपा स्तरीय मुलींमध्ये डॉक्टर
अण्णासाहेब जी डी बेडाळे व मुलांमध्ये अँग्लो उर्दू हायस्कूल ने तर
जिल्हास्तरीय मुलांच्या स्पर्धेत बियाणी पब्लिक स्कूल व मुली मध्ये बी झेड ने विजय संपादन केला

पारितोषिक वितरण समारंभ.
या कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण समारंभासाठी मिल्लत जुनिअर कॉलेजच्या प्राचार्य हफिफा शाहीन, पोलीस दलाच्या वाहतूक शाखेच्या श्रीमती मेघना जोशी, बेंडाळे महाविद्यालयाच्या प्राध्यापिका छाया चीरमाले,क्रीडा अधिकारी गुरुदत्त चौहान,हॉकी जळगावचे फारुक शेख यांच्या हस्ते हॉकी जळगाव व स्पोर्ट्स हाऊस तर्फे विजयी व उप विजयी खेळाडूंना पदके देण्यात आली.
यावेळी मीनल थोरात,मुख्तार सैयद, राहील अहमद, शादाब सय्यद, अरबाज खान, वर्षा सोनवणे, मुजफ्फर खान आदींची उपस्थिती होती.
स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू
बेंडाळे महाविद्यालयाची उर्मिला पाटील,अँग्लो उर्दू कॉलेजचे शहजाद मिर्झा, बियाणी पब्लिकचे तरण बारेला व रेहान तडवी व बी झेड चे जुनेद बेग यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले
स्पर्धेचा निकाल
मनापा
१)अँग्लो उर्दू जुनियर कॉलेज विजयी वी मिल्लत ज्यू. कॉलेज १-० (मुले)
२)डॉक्टर अण्णासाहेब जी डी बेंडाळे महिला महाविद्यालय विजय विरुद्ध अँग्लो उर्दू कॉलेज २-० (मुली)
जिल्हास्तर
१)बियाणी पब्लिक स्कूल भुसावळ विजय विरुद्ध
बी.झेड.महाविद्यालय भुसावळ १-० (मुले)
२) बी झेड महाविद्यालय मुली अंतिम विजेता घोषित
फोटो कॅप्शन
१)
२) विजयी व उप विजयी मुलांच्या संघा सोबत बसलेले फारुक शेख,मीनल थोरात, शादाब सैयद, राहील अहमद आदी दिसत आहे.