जरांगे-पाटील यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक, -जीआरमधील वंशावळी या शब्दावर जरांगे-पाटील यांनी घेतला आक्षेप.

24 प्राईम न्यूज 9 Sep2023 जालना येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री उशिरा सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या पहिल्यांदा मनोज जरांगे-पाटील यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक झाली. सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्या, अशी जरांगे-पाटीलयांची मागणी आहे. मात्र, ओबीसी नेत्यांनी जरांगे यांच्या या मागणीला विरोध केला आहे. त्यामुळे या बैठकीत त्यावर सहमतीने तोडगा काढण्याबाबत चर्चा झाली. उपोष्णकर्ते जरांगे-पाटीलयांच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळाने सरकारची भूमिका मांडली. सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, तर जरांगे-पाटील यांच्या शिष्टमंडळात सात जण सहभागी झाले होते. यामध्ये मराठा आंदोलक आणि अभ्यासक होते. सरकारकडून जीआर आणि महसुली वंशावळ अशा नोंदी तपासण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र, जीआरमधील वंशावळी या शब्दावर जरांगे-पाटील यांनी आक्षेप घेतला आहे.