सिंधी कॉलनी भागातील गट नं ४०० मधील नागरिकांचे पिण्याच्या पाण्या साठी भटकंती, नगरपालिकेचे दुर्लक्ष.

अमळनेर ( प्रतिनिधि ) अमळनेर येथील सिंधीकॉलनी गट नं. ४०० या गटात पाण्याची पाईपलाईन नसल्याने नागरिकांचे पिण्याच्या पाणी साठी हाल होत आहेत महिलांना पाणी दुरून आंनावे लागते पाण्याची मूलभूत सेवा मिळणे आवश्यक आहे पाईप लाईन नसल्याने नळ कनेक्शन घेता येत नाही तरी नगरपालिकेने या भागात पाईप लाईन टाकून सिंधी कॉलनी भागातील नागरिकांनची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी निवेदन देऊन केली आहेरविकुमार अंदानी (माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ) शामभाई मलकानी,आवतराम धर्माणी, रामभाई थदाणी, संजय मलकानी,संजय हिंदुजा, प्रकाश जीवनी,आदींनी सह्या केल्या आहेत.