हदपार असलेला आरोपी गावठी पिस्तल व जिवंत काडतूससह रावेर पोलीसांच्या ताब्यात.

रावेर ( शरीफ शेख ) गैरकायदा गावठी बनावटी एक पिस्टल व एक जिवंत काडतुस आरोपी कडुन हस्तगत केले बाबत . दिनांक १४ / ० ९ / २०२३ रोजी १७.१० वा पोउनि सचिन बी नवले , पोहेकॉ ईश्वर चव्हाण , पोना – सुरेश मेढे , पोशि सचिन घुगे , अमोल जाधव , सुकेश तडवी , प्रमोद पाटील , विशाल पाटील , तथागत सपकाळे , सुनिल मोरे समाधान ठाकुर असे रावेर पोलीसस्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना मा . पोलीस निरीक्षक श्री कैलास नागरे यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की , आकाश लक्ष्मण रील रा रामदेव बाबा नगर रावेर ता रावेर या सामा उप विभागीय दंडाधिकारी फैजपुर भाग फैजपुर यांच्या कडील हद्दपार प्रस्ताव क्रमांक ०३ / २०२३ प्रमाणे दिनांक २३/०३/२०२३ रोजी जिल्ह्यातुन दोन वर्षा करीता हद्दपारकेले असतातो रावेर शहरामध्ये आलेला आहे . मिळालेल्या बातमीच्या आधारे पोउनि नवले व स्टाफ हे घटनास्थळी गेले असता त्या ठिकाणी हद्दपार ईसम नामे आकाश लक्ष्मण रील रा रामदेव बाबा नगर रावेर ता रावेर हा त्याचे घराच्या पाठी मागे उभा असुन त्याने सोबत देशी बनावटीची लोखंडी धातुची गावठी पिस्टल ( अग्रिशस्त्र ) जवळ बाळगत असतांना मिळुन आला . मिळाला माल : – १५,००० / – रु किं . चा एक लोखंडी धातुचा सिल्व्हर रंगाचा देशी बनावटीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा व ५०० / – रु किं . चा एक जिवंत काडतुस असे इसम नामे आकाश लक्ष्मण रिल रा रामदेव बाबा नगर रावेर याच्या जवळ मिळून आला जु.वा.की. अ . . सदर कार्यवाही मा . पोलीस अधिक्षक श्री डॉ . एम . राजकुमार तसेच अप्पर पोलीस अधिक्षक श्री चंद्रकांत गवळी , उप विभागीय पोलीस अधिकारी श्री डॉ . कुणाल सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली मा . पोलीस निरीक्षक श्री कैलास नागरे , पोउनि सचिन बी नवले , पोहेकॉ ईश्वर चव्हाण , पोना सुरेश मेढे , पोशि सचिन घुगे , अमोल जाधव , सुकेश तडवी , प्रमोद पाटील , विशाल पाटील , तथागत सपकाळे , सुनिल मोरे , समाधान ठाकुर , अशांनी केली आहे .