आज मराठा समाजातर्फे मंत्री अनिल पाटीलसह गुणवंताचा होणार गौरव..

0

अमळनेर ( प्रतिनिधि) मराठा समाजातर्फे मदत व पूर्नवसन मंत्री अनिल पाटील यांच्यासह विविध गुणवंत व नूतन पदाधिकाऱ्यांचाही सत्कार आज आयोजित करण्यात आला आहे. मराठा समाजातील १० वी, १२ वी तसेच विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या गुणवंतांचा तसेच अमळनेरचे प्रथम मंत्री ना. अनिल भाईदास पाटील व विविध संस्थांमध्ये निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार होईल. सकाळी १० वाजता कै सुंदरबाई दिनकरराव देशमुख मराठा मंगल कार्यालय, अमळनेर येथे सत्कार आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ना. अनिल भाईदास पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, डॉ. बी. एस. पाटील, स्मिता उदय वाघ, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे उपसंचालक कपिल जयकर पवार, माजी नगराध्यक्ष विनोद भैय्या पाटील तर वक्ता व प्रवक्ता म्हणून प्रा. डॉ. लीलाधर शिवाजीराव पाटील उपस्थित राहतील. या सत्कार समारंभास सर्व मान्यवरांनी अवश्य उपस्थिती द्यावी असे आवाहन अमळनेर तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील व सर्व कार्यकारी मंडळाने केले आहे.यावेळी मुख्य सत्कारार्थी मंत्री अनिल पाटील तर इतर सत्कारार्थी मराठा समाजातील १० वी व १२ वीतील गुणवंत विद्यार्थी, उत्कृष्ठ पत्रकार संघ पुरस्कार प्राप्त अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती व संचालक मंडळ, खा शि मंडळाचे कार्याध्यक्ष व सर्व पदाधिकारी, अर्बन बँकेचे चेअरमन व सर्व संचालक मंडळ, श्री छत्रपती मराठा समाज पतपेढीचे चेअरमन व संचालक मंडळ, नवनियुक्त पोलीस पाटील, ग्रामविकास शिक्षण संस्था मुडी चे नवनियुक्त संचालक, मारवड संस्थेचे नवनियुक्त संचालक मंडळ आदी असणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!