मयत सचिन उर्फ सोनु देविदास पाटील खुन प्रकरणी न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची पोलीस कोठडी..

एरंडोल ( प्रतिनिधि )
कासोदा पोलिस स्टेशन येथील गु. र. क्रमांक 302,120(ब) आर्म ॲक्ट 4,24 प्रमाणे सह 34 दाखल गुन्हातील आरोपी क्र.6 अन्वर अली वाहिद अली रोशन अली यास आज रोजी एरंडोल न्यायालयात हजर केले असता सरकारी पक्षाने आरोपी ची पोलिस कोठडी ची मागणी केली तदनंतर सरकारी पक्षाचा व बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली सरकारी पक्षातर्फे ऍड कविता चव्हाण तर आरोपी क्र 6 तर्फे ॲड. जितेंद्र अ. कोळी व ॲड. जयेश अ. पिलोरे यांनी काम पाहिले.