मनपा जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत पोतदार स्कूल ,जळगाव ला दुहेरी मुकुट.
उत्कृष्ट खेळाडू म्हणून साक्षी व नील ची निवड

0

जळगाव ( प्रतिनिधी)

मनपा जिल्हास्तरीय १४ वर्षातील फुटबॉल स्पर्धेत मुली व मुलांमध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, जळगाव ने विजय संपादन केला तर उपविजे विजेतेपदी मुलांमध्ये सेंट जोसेफ तर मुलींमध्ये एल एच पाटील हा संघ राहिला.

महिला खेळाडूंची सांघिक भावना कौतुकस्पद – सुचिता हाडा
अत्यंत कडक उन्हातील १४ वर्षीय मुलींचा अंतिम सामना बघत असताना पोदार व पाटी

विजय दोन्ही पोद्दार संघाच्या खेळाडू सोबत खुर्चीवर बसलेले डावीकडून आमिर शेख, फारुक शेख, अमर जैन ,सुचिता हाडा, छाया बोरसे, अब्दुल मोहसिन आदी दिसत आहे

ल स्कूल च्या मुलींची जिद्द, सांघिक भावना व चिकाटी बघून मला अभिमान वाटतो म्हणून महिलांनी आपल्या आयुष्यात खेळाला सुद्धा महत्त्व द्यावे असे आवाहन जळगाव शहर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका एडवोकेट सुचिता हाडा यांनी केले त्या क्रीडा संकुल जळगाव येथे जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन ने आयोजित केलेल्या पारितोषिक वितरण समारंभात बोलत होत्या यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगरसेवक अमर जैन होते.
व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून संघटनेचे सचिव फारुक शेख, सहसचिव अब्दुल मोहसीन, संचालक एडवोकेट आमिर शेख, पोद्दारच्या क्रीडा संचालिका छाया बोरसे आदी उपस्थित होते.
अमर जैन यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विजेते व उप विजेते संघाना चषक देऊन त्यांचा गौरव केला
पंच
पंच म्हणून कौशल पवार, आकाश कांबळे, धनंजय धनगर, सुरज सपके, संजय कासदेकर, दिनेश सिंग, अरशद शेख, नीरज पाटील, वसीम शेख, सिद्धार्थ अडकमोल, लोकेश मांजरेकर यांनी कामगिरी पार पडली

स्पर्धेचा अंतिम निकाल खालील प्रमाणे
मुले

उपांत्य फेरी
१) सेंट जोसेफ वि.वि एल एच पाटील २-१(पेनल्टी)
२) पोद्दार वि.वि इकरा सालार ३-१(पेनल्टी)
अंतिम सामना
३) पोद्दार वि.वि सेंट जोसेफ
२-०
मुली
१.रोज लँड वि.वि सेंट जोसेफ २-०
२. गोदावरी वि.वि मिल्लत १-०
उपांत फेरी
३. एल एस पाटील वि.वि रोज लँड,२-०(पेनल्टी)
४. पोद्दार वि.वि गोदावरी
५-०
अंतिम सामना
५. पोद्दार वि.वि एल एस पाटील ६-०


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!