अमळनेरात अवैध गुटख्याची विक्री सुरूच!
गुटखाबंदीचे नियम धाब्यावर, अन्न व औषध प्रशासन, पोलिसांकडून संयुक्त कारवाईची गरज.

अमळनेर (प्रतिनिधि) राज्य सरकारने २०१२ पासून गुटख्याची निर्मिती आणि विक्रीवर कायदेशीर बंदी घातली आहे. प्रत्यक्षात मात्र कायदा धाब्यावर बसवून गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची राजरोस विक्री सुरूच आहे
अमळनेर तसेच ग्रामीण भागातील दुकाने व पानटपऱ्यांवर गुटखा विक्री बेकायदेशीरीत्या सुरूच आहे. तसेच काही ठिकाणी छुप्या पदतीने गुटखा विक्री करण्याचे काम सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाने पोलिसांनी वेळीच सदर गुटखा विक्रीवर देखरेख ठेवून कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांमध्ये असलेल्या मॅग्नेशियम कार्बोनेटसारख्या घातक घटकांमुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा समाना करावा लागतो विक्रेते यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करणे तसेच गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधितांना तीन वर्षांच्या कारावासाचीही तरतूद केली आहे.मात्र तरीदेखील गुटखा विक्री व वाहतूक सुरूच असल्याचे चित्र दिसून येते दुकानांमध्ये माळा लटकवून विक्री होत नसली तरी छुपी विक्री कमी नाही. रस्त्यांवर पडणार्या रिकाम्या पुड्यांवरून याचा अंदाज येतो. तरुणाईला माव्याचे व्यसन जडल्यामुळे पान टपर्यांवर नेहमीच गर्दी दिसते. अवैधगुटखा विक्रीवर कारवाई करण्याचेअधिकार अन्न व औषध प्रशासनासह पोलिसांनाही आहेत. गुटखा निर्मिती,तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी संशयास्पद वाहनांची नियमित तपासणी करणे, गुटखा विकणार्या विक्रेत्यांवर कारवाईचे काम सातत्याने सुरू राहिल्यास गुटखा विक्रेत्यांना आळा बसू शकतो प्रशासनाने या कडे लक्ष देण्याची गरज आहे अशी नागरिकांची मागणी आहे.