महाराष्ट्र शासनाच्या कंत्राट पद्धतीला युवकांनी निवेदन देऊन केला विरोध..

एरंडोल ( कुंदन ठाकुर)एरंडोल येथील असंख्य युवकांनी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या सरकारी नोकर भरती कंत्राट पद्धत अवलंबण्याच्या निर्णया विरोधात तहसीलदार सुचिता चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात आम्ही सर्व विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत आहोत. त्या दरम्यान शासनाने कुठलेही भरती प्रक्रिया राबविली नाही परंतु कंत्राट पद्धतीने सरकारी नोकर भरती घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो निर्णय समस्त स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारावर अन्यायकारक असल्याचे म्हटले असून शेवटी हा निर्णय लवकरात लवकर मागे घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे. निवेदनात असंख्य युवकांच्या सह्या आहेत.