एरंडोलला गुरु हनुमान कुस्तीगीर संस्था, छत्रपती क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने
शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न-700 कुस्तीगीरांचा सहभाग.

एरंडोल (कुंदन ठाकुर) – येथील गुरू हनुमान कुस्तीगीर संस्था आणि छत्रपती क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धांचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन आमदार चिमणराव आबा पाटील यांच्या हस्ते करण्या आले.
यावेळी शालेय कुस्ती स्पर्धेत 14, 17, 19 वष आतील मुली व 14 वर्ष आतील मुले तसेच 17 वर्ष आतील मुले फ्रीस्टाल व ग्रीको रोमन या स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धेमध्ये 700 कुस्तीगिरांनी सहभाग नोदविला होता. मुलांच्या व मुलींच्या 350 कुस्त्या घेण्यात आल्या. त्यात 75 वर्षा नंतर शालेय कुस्ती स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय खेळाडूंना सुवर्ण पदक, रौप्य पदक, कास्य पदक असे 250 पदके बहाल करण्यात आली. प्रमुख पाहूणे म्हणून नलिनी पाटील माजी नगरअध्यक्ष पारोळा, अॅड. किशोर काळकर (जनजाती मोर्चा प्रदेश समन्वय भाजपा महा.राज्य), अमोल पाटील (उपाध्यक्ष जळगाव मध्यवर्ती सहकारी बँक ), पो.नि. गोराड, बागल, वासुदेव पाटील, राजेंद्र चौधरी, गुरुदत्त चव्हाण, मीनल थोरात, समाधान पाटील, आनंद दाभाडे, सरला पाटील, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. राहुल वाघ, डॉ किरण पाटील, अशोक चौधरी, शालिग्रामभाऊ गायकवाड, रमेशअण्णा महाजन, विजयअण्णा महाजन, अमोल तंबोली, आशीर्वाद पहेलवान, बबलू पहेलवान, बाळा पहेलवान, लतीफ मिस्तरी, अस्लम पिंजारी, रुपेश माळी, मयूर महाजन, प्रा. आर. एस. पाटील,धामा पहेलवान, जाहिरोद्दिन शेख, मनोज मराठे, संजय शिंपी, सुदाम राक्षे, गोरख महाजन, गोपाल पाटील, लीलाधर पाटील, शाम जाधव यांचेसह पत्रकार उपस्थित होते. पंच म्हणून संजय पाटील, प्रा. मनोज पाटील, भानुदास आरखे, अजय देशमुख, दिलीप संगेले, एस. के पाटील, युवराज भोसले, कैलास आम्ले, दुर्गादास वानखेडे, गुलाब चव्हाण, राहुल साळुंखे, योगेश पाटील, पी.पी.पाटील, नयन आरखे, योगेश्वरी मराठे, सोपान निकम यांनी काम पहिले. यशस्वीतेाठी गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेचे पदाधिकारी आणि छत्रपती क्रीडा मंडळाचे पदाधिकारी पंकज पाटील, अनिल मराठे, ऋषिकेश महाजन, अनिल भोई, अनिल आरखे, जावेद खाटिक, संजय कुंभार, मयूर जाधव, निखील पवार, रवींद्र चिंचोले, एस. एस पाटील, भूषण चौधरी, मयूर मराठे, बापू मराठे, भय्या लोहार, लोकेश बाविस्कर, भूषण चौधरी, चंद्रशेखर वाघ, रोहित राजपूत, चेतन मराठे, आबा महाजन सर, आदींनी परिश्रम घेतले. सूत्र संचालन भानुदास आरखे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. मनोज पाटील सर यांनी केले.