शांतता-सुव्यवस्था राखण्यासाठी शहरातून पोलिसांचा रूट मार्च.

एरंडोल( कुंदन ठाकुर) गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद सणानिमित्त शहरात शांतता- सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष दंगा नियंत्रण पथक तसेच पोलीस होमगार्ड यांची कुमक मागविण्यात आली असून जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त फोर्सने शहरातून रुट मार्च काढून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पो. नि. गोराडे, पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, पीएसआय बागड यांचेसह पोलिस कर्मचारी, होमगार्ड कर्मचारी सहभागी झाले होते. रूट मार्च मरीमाता मंदिरापासून निघून मेन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अमळनेर दरवाजा, महात्मा फुले पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे निघून पोलीस स्टेशन आवारात सांगता करण्यात आली.