राष्ट्रवादीतील काही नेत्यांना भाजपानं फक्त लोकसभेसाठी जवळ केलं आहे. -भाजपा बरोबर गेलेल्या लोकांना कुठेही लोकमत आणि जनमत राहिलं नाही. -रोहित पवारांची भाजपवर टीका.

24 प्राईम न्यूज 23 Sep 2023 देशात २०२४ सालीहोणाऱ्या लोकसभा
निवडणुकीसाठी विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी आणि भाजपा कामाला लागले आहेत. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री
अजित पवार यांना बरोबर घेऊन जास्त जागा निवडून आणण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. पण, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर टीका केली आहे. एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीतील काही
नेत्यांना भाजपानं फक्त लोकसभेसाठी जवळ केलं आहे. पण, लोकांच्या मनात भाजपाच्या विरोधात वातावरण आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. रोहित पवार म्हणाले, भाजपा फक्त लोकसभेचा विचार करत आहे.
एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या काहीनेत्यांना भाजपानं फक्त लोकसभेसाठी जवळ केलं आहे. मात्र, लोकसभेला लोकांच्या मनातील वातावरण पाहिलं, तर भाजपाच्या विरोधात आहे. भाजपाबरोबर गेलेल्या लोकांना कुठेही लोकमत आणि जनमत राहिलं नाही. दरम्यान, भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याबाबत केलेल्या विधानावरून रोहित पवार यांनी भाजपावर गंभीर आरोप केले होते. मला असं वाटतं, भाजपाचे मोठे नेते मुद्दाम या छोट्या नेत्यांना पुढे करतात. परत म्हणतात की, या नेत्यांच्या विरोधात बोल शरद पवार यांच्याबद्दल बोलले. आम्ही समजू शकतो. पण, अजित पवारांना बरोबर घेऊन त्यांच्याविरोधात बोलतात. हे भाजपा
चं राजकारण आहे, असा हल्लाबोल रोहित पवार यांनी केला होता.