धुळे शहरात घरफोडी करणारे आरोपीत मुदद्देमालासह जेरबंद, आझादनगर पोलीसांची धडक कारवाई.

0

धुळे (अनिस खाटीक) आझादनगर पोलीस ठाणे हददीतील मनमाड जिन येथे अज्ञात इसमांनी फिर्यादी यांचे घराचे दरवाजाचे कुलूप तोडुन आत प्रवेश करुन घरातील लोखंडी कपाटातून १७,०००/- रु कि चे सोन्या चांदीचे दागिने तसेच ३०,०००/- रु रोख रक्कम

असा एकुण ४७,०००/- रु कि चा मुददेमाल घरफोडी चोरी करुन नेलेला होता त्यावरुन आझादनगर पोलीस ठाणे येथे दिनांक १०/०९/२०२३ रोजी फिर्यादी नामे स्वप्नील सुनिल गवळी, रा. ग. नं ०७, सोनदेव वाडा चौक, मनमाड जिन, धुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भाग ५ गुन्हा रजि नं २५२ /२०२३ भादं वि कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

तसेच दिनांक १८/०९/२०२३ रोजी रात्री ००:३० ते ०५.०० वा चे दरम्यान आझादनगर पोलीस ठाणे हददीतील रामदेव बाबा नगर येथे अज्ञात इसमांनी फिर्यादी यांचे घराच्या दरवाज्याचे कुलुप तोडुन आत प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले १०,०००/- रु रोख रक्कम तसेच १९,६००/- रु रकमचे सोन्या चांदीचे दागिने असा एकूण २९,६००/- रु रकमेचा मुद्देमाल घरफोडी चोरी करुन नेलेला होता त्यावरून आझादनगर पोलीस ठाणे येथे दिनांक १८/०९/२०२३ रोजी फिर्यादी नामे शेख नजीर शेख नदीर, रा घर नं ११२, रमजानबाबा नगर, धुळे यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन भाग ५ गुन्हा रजि नं २६१/२०२३ भादंवि कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. वरील प्रमाणे घरफोडीचे गुन्हे दाखल झालेनंतर आझादनगर पोलीस ठाणेकडील शोध पथक गुन्हयाचा तपास करीत

असताना पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदार यांचे मार्फत माहीती मिळाली की, नमुद दोन्ही गुन्हे हे साहील शाहा रा- रमजानबाबा नगर, धुळे याने त्याचे इतर साथीदार यांचे मदतीने केलेले आहेत. नमुद बातमी प्रमाणे योनि देशमुख यांनी शोध पथकातील सपोनि पाटील व अमलदार यांना पुढील कारवाई करणेबाबत आदेशित केलेने शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी नमुद आरोपीत नामे १) साहील सत्तार शाहा, रा- रामदेव बाबा नगर, धुळे यास त्याचे राहाते घरातून ताब्यात घेवून त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने दोन्ही गुन्हे त्याचे ईतर दोन साथीदार यांचे सह केल्याची कबुली दिलेली आहे. तदनंतर त्याचा एक साथीदार नामे २) तौसिफ सलीम शाहा, रा- रमजान बाबा नगर, धुळे यास देखील ताब्यात घेण्यात आले. दुसरा साथीदार हा फरार झालेला असुन त्याचा शोध घेत आहोत. दोन्ही आरोपीत यांचेकडुन दोन्ही गुन्हयामध्ये चोरीस गेलेल्या मालापैकी रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने असा एकुण रुपये ५२,३००/- रुपये रकमेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

वर नमुद आरोपीत यांचेकडुन आझादनगर पोलीस ठाणे कडील खालील नमुद दोन गुन्हे उघडकीस आलेले आहेत. १) आझादनगर पोलीस ठाणे भाग ५ गुन्हा रजि नं २५२ /२०२३ भादंवि कलम ४५७,३८० प्रमाणे

२) आझादनगर पोलीस ठाणे भाग ५ गुन्हा रजि नं २६९/२०२३ भादंवि कलम ४५७,३८० प्रमाणे

नमुद कारवाई ही मा पोलीस अधिक्षक श्री संजय बारकुंड साो, मा अपर पोलीस अधिक्षक श्री किशोर काळे सारे तसेच मा उपविभागीय पोलीस अधिकारी, धुळे शहर विभाग श्री सचिन हीरे सो यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सपोनि संदीप पाटील, सफी प्रकाश माळी, पो हवा योगेश शिरसाठ, पो हवा मुक्तार मन्सुरी, पो हवा शांतीलाल सोनावणे, पोना गौतम सपकाळे, पोना संदीप कढरे, पोना योगेश शिंदे, पोना अविनाश लोखंडे, पोकों अजहर शेख, पोकों सचिन जगताप, पोकॉ पंकज जोंधळे, पोकों अनिल शिंपी, पोकों मोरे, चालक पोकों संतोष घुगे अशांनी मिळून केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!