शरद पवार गटातील १० आमदारांच्या विरोधात याचिका. -अजित पवार गट आक्रमक.

24 प्राईम न्यूज 23 Sep 2023 शिवसेना पक्षातील फुटीनंतर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर कारवाई सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार आणि अजित पवार गटामधील संघर्ष आता तीव्र होण्याची चिन्हं आहेत अजित पवार गटाच्या वतीने गुरुवारी विधिमंडळात शरद पवार गटातील दहा विधानसभेच्या आमदारांविरोधात आणि विधानपरिषदेच्या तीन आमदारांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करणारी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली. पक्ष विरोधी कृती केल्यामुळे सदर आमदारांवर कारवाई करावी अशी मागणी अजित पवार गटाच्या वतीने करण्यात आली आहे. अजित पवार गटाकडून विधिमंडळात दाखल केलेल्या याचिकेत 11 पैकी 10 शरद पवार गटातील आमदारांचा समावेश करण्यात आला आहेविधानसभेतील या आमदारां विरोधात याचिका : 1)जयंत पाटील 2 ) जितेंद्र आव्हाड 3) रोहित पवार 4 ) सुमन पाटील 5 ) सुनील भुसारा 6) प्राजक्त तनपुरे 7) बाळासाहेब पाटील 8 ) अनिल देशमुख 9 ) राजेश टोपे 10) संदीप क्षिरसागर
विधान परिषदेतील या आमदारांविरोधात याचिका. 1) शशिकांत शिंदे 2) अरुणकाका लाड 3) एकनाथ खडसे.