अजित पवार मुस्लिम आरक्षणासाठी सरसावले. मुस्लिम आरक्षण बैठकीवरून वाद होणार?

24 प्राईम न्यूज 23 Sep 2023
धर्माच्या आधारावर आरक्षण न देण्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छेद दिला आहे. मागासवर्गीय म ुस्लीम अल्पसंख्याकांसाठी सामाजिक तसेच शैक्षणिक आरक्षण देण्याच्या बाबतीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून किमान शैक्षणिक आरक्षण कसे देता येईल हे बघू, असे आश्वासनअजित पवार यांनी गुरुवारी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. या आश्वासनामुळे मुस्लीम आरक्षणावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद समोर आले आहेत.
| मौलाना आझाद महामंडळाच्या भाग भांडवलात वाढ
या बैठकीत मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या भाग भांडवलामध्ये वाढ करणे आणि सरकारने द्यावयाच्या हमी संदर्भातदेखील चर्चा करण्यात आली. महामंडळाचे सध्याचे भाग भांडवल ७०० कोटी रुपये असून ते टप्प्या-टप्प्याने १ हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्यात येईल. राज्य सरकारने ३० कोटी रुपयांची कर्ज हमी दिलेली आहे. त्यात वाढ करून ती टप्प्या- टप्प्याने ५०० कोटी रुपयांपर्यंत नेण्यात येईल, असेही पवार यांनी सांगितले.