जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत मुलांमध्ये पोदार तर मुलींमध्ये ओरियन स्टेट विजेते.

जळगाव ( प्रतिनिधी )
जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे सुरू असलेल्या आंतरशालेय १७ वर्षातील फुटबॉल स्पर्धेत मुलांच्या अटातटीच्या स्पर्धेत पोदार इंटरनॅशनल स्कूल ने सेंट लॉरेन्स चा १-० ने पराभव केला तर मुलींच्या स्पर्धेत ओरिएंट स्टेट च्या मुलींनी पोदार इंटरनॅ
शनल चा पेनल्टी मध्ये २-१ ने पराभव करीत अंतिम विजेतेपद पटकाविले.

पारितोषिक वितरण
विजेते व उपविजेते संघांना जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन व स्पोर्ट्स हाऊस जळगाव तर्फे चषक देण्यात आले.
पारितोषिक समारंभास जळगाव नगरीचे माजी नगरसेवक प्रशांत नाईक व आम आदमी पार्टीच्या जिल्हाध्यक्ष श्रीमती अमृता नेटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर संघटनेचे सचिव फारूक शेख, कार्याध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक अनिता कोल्हे, सहसचिव अब्दुल मोहसीन, क्रीडा शिक्षिका सौ छाया बोरसे आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा अंतिम निकाल
मुले
१) पोदार वि.वि एस व्ही के एम (एम जे). ४-२
२) ओरियन सीबीएससी वि.वि सेंट जोसेफ ४-
३) पोदार वि.वि इकरा शाहिन ५-४ (पेनल्टी)
४)सेंट टेरेसा वि.वि ओरियन सीबीएससी १-०
अंतिम सामना
५)पोदर वि.वि सेंट टेरेसा१-०
मुली
१. ओरियन सीबीएससी वि.वि न्यू इंग्लिश आर आर
४-३ (पेनल्टी)
२.रोजलँड वि.वि मिलत१-०
३. ओरियन स्टेट वि.वि रायसोनी इंग्लिश ४-२
४. पोदार वि.वि एन सी बी एस सी १-०
५. गोदावरी वि.वि सेंटजोसेफ
१-०
६. रोझलँड वि.वि एल एच पाटील २-०
७. ओरियन स्टेट वि.वि गोदावरी २-०
८. पोदार वि.वि रोज लँड
२-०
अंतिम सामना
९. ओरियन स्टेट वि.वि पोदार
२-१ (पेनल्टी)