जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत बालमोहन व प्रताप चोपडा, शानबाग जळगाव व बुरहाणी पाचोरा विजेते.

जळगाव (प्रतिनिधी)
जिल्हास्तरीय आंतर शालेय १७ व १९ वर्षे वयोगटातील मुलं आणि मुलींच्या स्पर्धा नूतन मराठा महाविद्यालयात संपन्न झाल्या.
अंतिम निकाल १७ वयोगट
मुलांच्या गटात
१) शानबाग विद्यालय जळगाव अंतिम विजेता तर इंदिराबाई ललवाणी,जामनेर उपवि
जेता ठरला.
२)मुलींमध्ये
बुरहानी इंग्लिश मीडियम स्कूल पाचोरा विजयी तर पी आर हायस्कूल धरणगाव उपविजय ठरले.
१९ वर्ष वयोगट

१९ वर्षा आतील मुलांच्या स्पर्धेत
१) बालमोहन उच्च माध्यमिक विद्यालय चोपडा अंतिम विजेता तर मु मा कनिष्ठ महाविद्यालय पाचोरा उपविजेता ठरला
२) मुलींमध्ये
प्रताप विद्या मंदिर चोपडा विजेता तर इंदिरा गांधी विद्यालय धरणगाव उपविजेता ठरला.
विजयी व उपविजय संघांना पासिंग वॉलीबॉल असोसिएशन तर्फे विभागीय पातळी साठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या स्पर्धेचे उद्घाटन नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एल पी देशमुख आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू मंजुषा भिडे यांच्या हस्ते करण्यात आले होते यावेळी पासिंग वॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष फारुख शेख सचिव शिवछत्रपती प्राप्त पुरस्कार प्राप्त अंजली पाटील, संघटनेचे इफ्तेखार शेख,भाऊसाहेब पाटील, क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाणे, मार्गदर्शक राजेंद्र चौहान आदींची उपस्थिती होती.
स्पर्धेचे पंच
राष्ट्रीय पंच मंजुषा भिडे, राज्य पंच इफ्तेखार शेख,दर्शन आटोळे,धनंजय आटोळे ,भावेश शिंदे, हर्षल भोसले , कु. कृपा बाविस्कर व यश जंजाळे आदी परिश्रम घेत आहे.
फ