अमळनेर नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांची झाली आरोग्य तपासणी.

अमळनेर( प्रतिनिधि )
स्वच्छता पंधरवडा निमित्त राबविला उपक्रम
अमळनेर -येथील नगरपरिषदेच्या वतीने 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता पंधरवडा राबविला जात असून याअंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले.
इंदिरा भुवन येथे दि 23 सप्टेंबर रोजी हे शिबीर आयोजित करण्यात आले होते,यावेळी आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ शरद बाविस्कर,डॉ दीपक धनगर,डॉ पुष्पक चौधरी, डॉ गरीमा पारख, डॉ रेणुका पाटील तसेच नगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ विलास महाजन यांनी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली,तसेच विविध आजारांच्या निदानासाठी रक्त तपासणीही करण्यात आली.आजाराचे निदान झालेल्या रुग्णास पुढील उपचारासाठी योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.
अमळनेर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील सुमारे 480 कामगारांनी या शिबिराचा लाभ घेतला.शिबिराच्या यशस्वीतेसाठी स्वच्छता निरीक्षक युवराज चव्हाण,हैबत पाटील व संतोष बिऱ्हाडे यांचे सह न प दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ विलास महाजन तसेच आरोग्य सेविका सगुना बारेला,आरती शिंगारे, सविता पाडवी,परळके,चेतन नेरकर, पवन मराठे,विट्ठल भोई,राहुल महाजन,सारिका मोरें यांनी परिश्रम घेतले. रक्त संकलन कोमल चव्हाण यांनी केले.