शहरातुन नगरपरिषद मालकीच्या तीन झाडांची चोरी.
नगरपरिषदेच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.

अमळनेर(प्रतिनिधि) शहरात वृक्ष संवर्धन करण्यासाठी येथील नगरपरिषदेने विविध ठिकाणी झाडे लावली असताना यातील तीन झाडांची चक्क चोरी झाली असून सदर जिवंत झाडे तोडून चोरून नेल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अमळनेर नगरपरिषदेतील अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांनी अमळनेर पोलिसात ही फिर्याद दिली असून सदर फिर्यादीवरून अमजदखान उस्मान खान मेवाती,मोहसीन खान शफी आणि भुऱ्या खान अख्तर खान मेवाती या तिघांविरुद्ध भादवी कलम 379,34 व 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर आरोपींनी कोणतीही परवानगी नसताना 8 हजार रुपये किमतीचे पिंपळाचे झाड,9 हजार रु किमतीचे निंबाचे झाड व 8 हजार रुपये किमतीचे वडाचे झाड असा एकूण 25 हजार रुपये किमतीचा माल चोरून नेला आहे.यातील पिंपळाचे झाड पवन टी स्टॉल च्या मागून,निंबाचे झाड बाजार समिती मागील सुरभी कॉलनीतुन तर पैलाड भागातील दादाजी हॉटेल जवळून वडाचे झाड चोरून नेले आहे.
दरम्यान सदर प्रकार पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनीही गांभीर्याने घेतला असून त्यांच्या आदेशानुसार पुढील तपास पो हे कॉ प्रमोद पाटील करीत आहेत.