शिंदे अपात्र ठरल्यानंतर मुख्यमंत्री कोण?

24 प्राईम न्यूज 24 sep 2023
एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी लागलीच, तर सरकार कोसळणार. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. अशावेळेस भाजप नेते अजित पवारांना सोबत घेऊन पुन्हा सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात, मात्र प्रश्न आहे तो मुख्यमंत्री कोण होणार ? अजित पवार यांच्या पाठिंब्याशिवाय भाजपला सरकार स्थापन करता येणार नाही. त्यामुळे अजित पवार म्हणतील तीच भाजपसाठी पूर्वदिशा असेल. तेव्हा अजित पवार मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही राहण्याची शक्यता अधिक आहे, असे विश्लेषकांचे मत आहे.