न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये गणरायाचे सातव्या दिवशी मोठ्या उत्साहात विसर्जन.

एरंडोल( प्रतिनिधि ) शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये गणरायाचे मोठ्या जल्लोषात विसर्जन करण्यात आले न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्रथम वर्षी गणेशाची स्थापन

संस्थेचे अध्यक्ष श्री शरदचंद्रजी काबरे यांचा अध्यक्षतेत होऊन माननीय सदस्य श्री पंकजजी काबरा यांच्या हस्ते पूजन करून मूर्ती स्थापना करण्यात आली व दररोज सकाळची आरती संस्थेचे अध्यक्ष शरदजी काबरा उपाध्यक्ष श्रीकांतजी कांतीलाल काबरा सचिव श्रीकांतजी काबरा सहसचिव सागरजी मानुधने शाळेचे चेअरमन सिद्धेशजी महाजन, सदस्य अनुपमजी जाजू, नितीनजी राठी, राजीवजी मणियार, संजयजी काबरा, जगदीश बिर्ला, शाळेच्या प्रिन्सिपल सरला विंचुरकर व्हॉइस प्रिन्सिपल सरिता पाटील शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनाही आरतीचा मान मिळाला व या प्रसंगी रोज प्रसादाची व्यवस्था संस्थेचे सन्माननीय सदस्य संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आली सहाव्या दिवशी शाळेमध्ये गणपती स्थापनेनिमित्त शाळेचे चेअरमन सिद्धेश महाजन सह पत्नी यांच्या हस्ते श्री सत्यनारायणाची पूजा करण्यात आली सात दिवसीय गणेश उत्सवामध्ये प्रथम तीन दिवस शाळेमध्ये प्री प्रायमरी प्रायमरी व माध्यमिक या तीन ग्रुपमध्ये विद्यार्थ्यांच्या आजी आजोबा दिवस साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांना निमंत्रण देऊन त्यांच्यासाठी खेळ ठेवण्यात आले व प्रत्येक आजी-आजोबाला बॉल पास संगीत खुर्ची लिंबू चमचा टोपी पास असे विविध खेळ खेळण्याची स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी देऊन प्रथम द्वितीय व तृतीय येणाऱ्या आजी-आजोबांना शाळेतर्फे बक्षीस वितरण करण्यात आले सात दिवशीय गणेश उत्सवामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देत विविध उपक्रम सादर केले व सातव्या दिवशी मोठ्या उत्साहात शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी प्रिन्सिपल संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव शाळेचे चेअरमन, सदस्य सर्व उपस्थित होते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी लेझीम च्या तालावर ठेका घेतला मुला मुलींनी पांढरा पोशाख फेटे बांधून जल्लोषात गणरायाचे विसर्जनात सहभाग घेतला व सातव्या दिवशी शाळेकडून सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना महाप्रसादाची भंडारा सहभोजनची व्यवस्था शाळेत करण्यात आली.