विखारी व घृणास्पद वक्तव्य करणाऱ्या बिघुडी ची खासदारकी रद्द करा – सर्व पक्षीय व सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी..

जळगाव ( प्रतिनिधि )लोकसभेत भाजप खासदार रमेश बिघूडी यांनी बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांना जी धर्मवाचक शिवीगाळ केली व संसदेचे पवित्र नष्ट केले त्यापेक्षा जास्त भारतीय मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या त्यांच्या या कृतीचा व वक्तव्याचा निषेध करीत त्यांना त्वरित निलंबि
त करून त्यांची खासदारकी रद्द करावी अशी एक मुखी मागणी जळगाव शहरातील विविध सामाजिक व राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन लोकसभा अध्यक्षांना जिल्हाधिकारी जळगाव मार्फत एका निवेदनाद्वारे केली आहे.

सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांना सुपूर्द करण्यात आले.
निवेदनातील प्रमुख मागण्या
१) भाजप खासदार रमेश बिघूडी यांच्यावर जनप्रतिनिधी तत्व कायदा १९५१ च्या अंतर्गत कलम १२३ नुसार त्यांनी भारतीय नागरिकांच्या विविध वर्गाच्या दरम्यान घृणा निर्माण केली व शत्रुत्वाची भावना प्रस्तावित केल्याने त्यांचे लोकसभेचे सभासदत्व कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे.
२) विखारी वक्तव्य करताना माजी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन व माजी कायदामंत्री रविशंकर प्रसाद हे ज्या प्रकारे रमेश निघुडी यांना हसून प्रोत्साहित करीत होते त्यांच्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई करण्यात यावी.
३) खासदार राहुल गांधी वर जर एका व्यक्तीच्या आडनावावरून मानहानीचा फौजदारी खटला दाखल होऊन शिक्षा झाल्याने लागलीच लोकसभेने त्यांचे सभासदत्व रद्द केले होते. या ठिकाणी तर रमेश बिघुडी यांनी एका व्यक्तीचे नव्हे तर संपूर्ण मानव जातीचे, समाजाचे व पवित्र अशा संसदेचे पावित्र्य नष्ट केल्याने त्यांना त्वरित निलंबित करून त्यांचे सभासदत्व रद्द करण्यात यावे.
लोकसभा अध्यक्षांनी जर यावर त्वरित निर्णय न घेतल्यास सर्व धर्मीय, सर्वपक्षीय समाज रस्त्यावर येईल व तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल अशी भावना शिष्टमंडळाचे प्रमुख जळगाव जिल्हा मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी व्यक्त केली.
शिष्टमंडळात यांचा होता समावेश
बीरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मझहर पठाण, कुल जमातीचे अध्यक्ष सय्यद चांद, एम आय एम पार्टीचे अध्यक्ष अहमद सर, काँग्रेसचे महानगराध्यक्ष नदीम काझी, हुसेनी सेना अध्यक्ष फिरोज शेख, मुस्लिम ईदगाह ट्रस्टचे सहसचिव अनिस शाह, इमदाद फाउंडेशनचे मतीन पटेल, सिकलगर फाउंडेशनचे अध्यक्ष अन्वर खान, राष्ट्रवादी मीडिया प्रमुख सलीम इनामदार, मरकज फाउंडेशनचे अब्दुल रऊफ रहीम व अख्तर शेख, युवा बिरादरीचे वसीम शेख व जुबेर युसुफ, जननायक फाउंडेशनचे आबीद शेख व मोबिल पटेल, तांबापुर सामाजिक कार्यकर्ते अमजद खान, नशिराबादचे सामाजिक कार्यकर्ते सय्यद बरकत अली आदींची उपस्थिती होती,