आरक्षणाबाबत पंतप्रधानांचे वक्तव्य चुकीचे. शरद पवार

24 प्राईम न्यूज 27 Sep 2023 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेमध्ये भाषणात महिलांच्या आरक्षणासंदर्भात जो निर्णय एकमताने घेतला, त्याला काँग्रेससह काही पक्षांनी इच्छा नसताना सहमती दर्शवली, असे म्हटले होते, हे त्यांचे वक्तव्य क्लेषदायक आहे. इतक्या वर्षात महिलांसाठी कोणी काही केले नाही, असेही त्यांचे मत आहे. पण ते चुकीचे आहे. महिलांना आरक्षण देण्याचे काम आम्ही केले. देशात पहिले महिला धोरण जाहीर झाले. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ३३ टक्के आरक्षण दिले, हे आरक्षण देणारे महाराष्ट्र पाहिले राज्य होते. मी संरक्षण मंत्री असताना तिन्ही दलात महिलांसाठी ११ टक्के जागा राखीव ठेवल्याचे राष्ट्रवादी या काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.