बक्षिसपात्र मुला-मुलींच्या चेहर्यावरील आनंद पाहून भारावलो-विकास नवाळे
-एरंडोलला सरस्वती कॉलनी गणेश मंडळाचे गणेश विसर्जन शांततेत, उत्साहात संपन्न..

एरंडोल (कुंदन ठाकुर)सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील शहरातील सरस्वती कॉलनी गणेश मंडळाचे गणेश विसर्जन 7 व्या दिवशी शांंततेत आणि उत्साहाच्या वातावरणात (सोमवारी) संपन्न झाले. दरम्यान विविध स्पर्धा, खेळ घेण्यात आले. बक्षीसपात्र मुला-मुलींना न. पा. मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या हस्ते बक्षिसे वाटप करण्यात आले. यावेळी बक्षीसपात्र मुला-मुलींच्या चेहर्यावरील आनंद पाहून मन भारावले असे नवाळे यांनी सांगितले.
बक्षिस वितरण समारंभाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सदस्य तथा मानद सचिव प्रा. आर. एस. निकुंभ होते. यावेळी व्यासपीठावर नपा इंजि. शिंदे, ज्येष्ठ पत्रकार प्रा. शिवाजीराव अहिरराव, माजी उपनगराध्यक्षा शकुंतला अहिरराव, ज्येष्ठ सदस्य प्रा. पी. डी. पाटील होते. प्रास्ताविक प्रा. अहिरराव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. मीना काळे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. बालाजी पवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. बालाजी पवार, श्री. जिजाबराव पाटील, प्रा. सोमनाथ सैंदाणे, प्रा. डॉ. राम वानखेडे, प्रा. महेश वसईकर, श्री. राजेंद्र ठाकूर, प्रा. मिलींद पाटील, श्री. गोपाल पाटील, श्री. सुनिल चौधरी, श्री. बापू मराठे यांचेसह सचिन कोळी (सोनवणे), तेजस मराठे, सुमित पाटील, नितेश मोरे, ओम भवार आदींनी परिश्रम घेतले. विशेष म्हणजे संगीत खूर्ची, लिंबू चमचा स्पर्धा, डान्स आदी स्पर्धांमध्ये मुले-मुली-महिलांनी भाग घेवून बक्षिसे मिळविली. सातव्या दिवशी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गणेश विसर्जन वाजत-गाजत करून जुने पद्मालयाकडे (अंजनी नदी काठावरील) करण्यात आले. शांततेत आणि उत्साहाच्या वातावरणात गणेश विसर्जन संपन्न झाले. डॉ. नरेंद्र ठाकूर (भाजपा नगरसेवक) यांनी मुला-मुलींना टी शर्ट तर स्नेह भोजनासाठी डॉ. बालाजी पवार, प्रा. डॉ. मीना काळे यांनी प्रायोजकत्व स्विकारले.