जळगांव जिल्हाधिकारींनी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्यान सोबत ग्राहकाच्या समस्यावर केली चर्चा..

एरंडोल( कुंदन ठाकुर)जळगांव जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य यांनी जळगांव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची सदिच्छा भेट घेवून ग्राहकांसंबंधी शहरातील न. पा. आदिंबाबत चर्चा करून सोडवणूकीसाठी विनंती केली. सदरप्रसंगी जळगांव जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य डॉ. अनिल देशमुख, अॅड. भारती अग्रवाल, अॅड. शिरीन अमरेलीवाला, महेश कोठावदे, प्रा. शिवाजीराव अहिरराव यांनी बैठकीत चर्चा करून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना ग्राहक भैरव स्मरणिका भेट दिली. तसेच प्रा. शिवाजीराव अहिरराव यांनी एरंडोलच्या अंजनी नदीबाबत स्वच्छता, खोलीकरण, घाणीबाबत आणि 15 वर्षांपासून अपूर्ण अवस्थेतील घरकुलांबाबत निवेदन दिले. यावेळी त्वरीत दखल घेवून सोडवणूकीसाठीचे आश्वासन दिले.
जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड यांची देखील भेट घेवून ग्राहक समस्यांची सोडवणूकीसाठी ग्राहक सरंक्षण परिषद सदस्यांनी चर्चा केली.