पिंपळे खुर्दला विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह सत्कार समारंभ..

0

अमळनेर( प्रतिनिधि)

विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन आवडीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून गावाचा नावलौकिक वाढवावा – मा. चेतन राजपूत

अमळनेर- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेला मेहनतीने आणि जिद्दीने अपेक्षित यश सहज मिळू शकतात. यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे आहे, असे मत अविनाश पाटील सर आदर्श शिक्षण प्रसार मंडळ धुळे यांनी व्यक्त केले. पिंपळे खुर्द (ता अमळनेर) येथे झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन तसेच गुणवंत विद्यार्थी प्रसंगी ते बोलत होते.
ओम साई फाउंडेशन तर्फे झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन अमळनेर तालुका पत्रकार व ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी होते
जनवास्तव कार्यकारी संपादक किरण पाटील,
अमळनेर तालुका पत्रकार व ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील,
शिवशाही फौंडेशनचे सचिव उमेश काटे सर ,पिपळे हायस्कूलचे सेवा निवृत्त मुख्याध्यापक सुरेंद्र सूर्यवंशी . विज्ञान मंडळाचे तालुकाध्यक्ष निरंजन पेंढारे, विजय पवार सर, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल प्रिन्सिपल हेमंत देवरे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष निंबाजी चौधरी, डी बी पाटील, धुळे येथील वैद्यकीय क्षेत्रात वीस वर्षाचा अनुभव अविनाश पाटील सरांचे मित्र सुनील पाटील सर,आर जे पाटील सर
आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
जयवंतराव पाटील, गोकुळ चुडामन पाटील छोटू पुना चौधरी,पिंपळे बुद्रुकचे माजी सरपंच योगेश अशोक पाटील,नारायण दामू पाटील, नाटू राघो पाटील,भास्कर झगडू चौधरी, ज्ञानेश्वर रावण पाटील, हरीलाल गुलाब परील,राजेंद्र मन्साराम पाटील , निबा दयाराम चौधरी ,
निबा शांताराम पाटील,कमलेश दादाभाई पाटील,गोविदा दयाराम चौधरी, पिंपळे बुद्रुक येथील (कै)सुकलाल आनंदा माध्यमिक विद्यालयात दहावीत प्रथम आलेला विद्यार्थी मयुरी भिला पाटील यांना दिनेश प्रेमराज पाटील यांच्याकडून एक हजार एक रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. यावेळी “ओम साई” तर्फे गीतगायन स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा, धावण्याची स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात गणपती नृत्य, देशभक्ती गीते तसेच “इडा पिडा टळु दे” ही नाटिका सादर करण्यात आली. “ओम साई” चे संचालक ज्ञानेश्वर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. युवराज पाटील यांनी आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!