ईद-ए-मिलादनिमित्त शुक्रवारी सुट्टी. -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय.

24 प्राईम न्यूज 28Sep 2023
अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन आणि
ईद-ए-मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे गुरुवारी (दि. २८) होणार आहे. तसेच राज्य सरकारने शुक्रवार, २९ रोजी ईद-ए-मिलादची शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवारी शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली होती. राज्यात शांततेचे वातावरण असावे आणि गर्दी तसेच मिरवणुकांचे नियोजन करता येणे पोलिसांना शक्य व्हावे म्हणून २९ तारखेस सुट्टी देण्याची विनंती त्यांनी केली होती. या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीम खान आदींचा समावेश होता.