मुस्लिम मनियार बिरादरी चे स्तुत्य उपक्रम. –ईद-ए-मिलाद च्या पूर्वसंध्येला प्रेषितांच्या शिकवणीनुसार गरजवंत व गरिबांना वस्तूंचे वाटप.

जळगाव ( प्रतिनिधि )
२८ सप्टेंबर गुरुवारी भारतभर ईद-ए-मिलादुन्नबी साजरी होत आहे. हा दिवस इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद (स) यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो.अंतिम प्रेषित मोहम्मद हे इस्लाम धर्माचे संस्थापक नाहीत ते ईश्वराचे एक दूत म्हणून कार्यरत होते.
अंतिम प्रेशित ला मानवंदना
अंतिम प्रेषिताला मानवंदना म्हणजे जेव्हा केव्हा मुस्लिम मोहम्मद पैगंबराचे नाव उच्चारतात तेव्हा अल्लाह जवळ पैगंबर यांना शांती लाभण्याची प्रार्थना करतात. अरबीमध्ये ही प्रार्थना सल्लल्लाहू आलेही व सल्लम अशी आहे. दुसरी कोणत्याही प्रकारची मानवंदना ग्रंथात दिसून येत नाही
नेहमीसाठी सत्कार्य करण्याचे आदेश
प्रेषितांचे संपूर्ण ६३ वर्षाचे जीवन चरित्रावर अवलोकन करता प्रत्येक मुस्लिम धर्मियांचे कर्तव्य आहे की प्रेषितांनी आपल्या जीवन चरित्रात जे काही सत्कार्य केलेले आहे तेच करावे त्यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या अनुयायांनी जे कृत्य केलेले नाही ते कृत्य आपण करता कामा नये असे धर्म म्हणतो व त्यानुसार त्यांची जयंती असली तरी त्यांचे जीवन चरित्र आपल्या जीवनात अंगीकारणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे.
बिरादरी चे स्तुत्य उपक्रम
मानियार बिरादरीने ईद ए मिलाद च्या पुर्व संध्येला गरजवंत ४ महिलांना शिलाई मशीन,२५ गरजू लोकांना वैद्यकीय व स्वयं रोजगार साठी आर्थिक सहकार्य तसेच २५ गरिबांना रेशन किट उपलब्ध करून दिले.
उधळपट्टी नव्हे तर कल्याणकारी कार्य करा
कोणत्याही संघटनेने ईद ए मीलाद निमित्त उधळपट्टी न करता मानव जातीच्या कल्याणासाठी कार्य करावे जे आम्हास अंतिम प्रेषितांनी आदेशित केले आहे असे आवाहन बिरादरी चे अध्यक्ष फारुक शेख यांनी केले आहे