ईद-ए-मिलाद निमित्त मनियार बीरादरी तर्फे ईद शिदोरीचे वाटप..

0

जळगाव ( प्रतिनिधि )

गुरुवार २८ सप्टेंबर रोजी ईद ए मिलादुन्नबी निमित्त जळगाव जिल्हा मुस्लिम मणियार तसेच हिटलर डेनिम संस्थेच्या सहकार्याने जळगाव शहरात विविध ठिकाणी ईदच्या शिदोरीचे वाटप करण्यात आले यात प्रामुख्याने जिल्हा सामान्य रुग्णालय, कांता

ई सभागृह, शिरसोली नाका झोपडपट्टी, गणेश मंडळाचे निर्माल्य जमा करणारे कार्यकर्ते व बंदोबस्त करणारे पोलीस बांधवांना शिदोरीसह पाण्याची बॉटल देण्यात आली.
अंतिम प्रेषितांची हीच शिकवण – फारुक शेख
ईद-ए-मिलादुन्नबी म्हणजे अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद (स) यांची जयंती या निमित्त मन्यार बीरादरीने हा स्तुत्य उपक्रम राबविला.

ईद च्या शिदोरीचे विविध भागात वाटप करताना घेतलेले

अंतिम प्रेषित हे संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी ईश्वराने त्यांना या भूतलावर पाठवले होते व त्यांनी आपले जीवन कसे जगावे हे. जगाला दाखवून दिल्याने त्यांच्या या वाढदिवसाला कोणत्याही प्रकारचे अनाठाई खर्च किंवा उधळपट्टी न करता गरजवंत लोकांना ईदची शिदोरी म्हणजे( गोड भात) चे वाटप कंटेनरच्या माध्यमाने सुमारे १००० कंटेनर यावेळी वाटण्यात आले. यासोबत हिटलर डेनिम यांनी अर्धा लिटर पाण्याची बाटली सुद्धा दिली.

या सहकारी मित्रांनी केले सहकार्य
जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांच्या नेतृत्वात हिटलर डेनिम चे नूर खान, नावेद खान,नोबल खान, अमान खान, अबुजर खान, एंजल फूड फाऊंडेशन चे इम्रान खाटीक, साहिल शाह, मोहसीन शाह, रहमान शेख व दानियल अलाउद्दीन, मनियार बिरादरीचे रऊफ टेलर,अख्तर शेख, वसीम शेख, मोहसीन शेख, जुबेर पठाण व मुजाहिद शिकलगर तर उस्मानिया पार्कचे समाजसेवक समीर शेख आदींचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!