खंजिरी वादक सत्यपाल महाराज आज अमळनेरात

अमळनेर ( प्रतिनिधि )
लोक संघर्ष मोर्चा च्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी सांयकाळी ६-०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे अमळनेरात सप्त खंजिरी वादक, समाजप्रबोधक सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमाला अमळनेर शहरासह तालुक्यातील जास्तीत जास्त संख्येने हजर राहण्यासाठी लोक संघर्ष मोर्चा सह, मुस्लिम युथ सेवा फाउंडेशन, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, बामसेफ, युवा कल्याण प्रतिष्ठान, आदिवासी पारधी विकास परिषदेतर्फे आवाहन तथा विनंती करण्यात आली आहे.