अपर पोलीस महासंचालकपदी आयपीएस कैसर खालिद यांची नियुक्ती..

24 प्राईम न्युज 29 Sep 2023
आयपीएस कैसर खालिद यांची अपर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तत्पूर्वी ते पुण्यातील मोटार वाहन परिवहन विभागात विशेष पोलीस महासंचालकपदी कर्तव्य बजावत होते.
अपर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करून राज्य शासनाने आयपीएस कैसर खालिद यांच्याकडे नागरी हक्क संरक्षण विभागाची जबाबदारी दिली आहे. आयपीएस कैसर खालिद यांनी आजवरच्या पोलीस खात्यातील प्रवासात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कर्तव्यासोबत त्यांनी लोकहिताचे निर्णय घेऊ न अनेक उपक्रम राबवले आहेत. आता तर ते नागरी हक्क संरक्षण विभागाद्वारे प्रत्येक नागरिकाच्या हिताच्या अनुषंगाने कर्तव्य बजावतील, यात दुमत नाही.