प्रताप महाविद्यालयात पर्यावरणपूरक शास्त्रयुक्त श्रीगणेश विसर्जन..

अमळनेर( प्रतिनिधि)
अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाच्या वतीने दि. २८ सप्टेंबर रोजी शास्त्रीय पद्धतीने गणपती विसर्जन करण्यात आले. यासाठी विभागातील श्रीगणेश मूर्तीच्या वजना इतके अमोनियम बायकार्बोनेट एका मोठ्या बादलीत घेतलेल्या पाण्यात टाकण्यात आले व याच पाण्यात श्रीगणेश मूर्ती विसर्जित करण्यात आली. साधारणतः आठ ते दहा दिवसात या पाण्यात प्लास्टर ऑफ पॅरिस ने बनवलेली मूर्ती जी पाण्यात विघटीत होत नाही, ती या पाण्यात असलेल्या अमोनियम बायकार्बोनेट की जो पाव मध्ये वापरण्यात येणारा पदार्थ (सोडा) या दोघं केमिकलची रिएक्शन होऊन त्यापासून पाण्यात विरघळणारे अमोनियम सल्फेट जे एक नत्र व गंधक देणारे असे झाडांसाठी उपयुक्त मिश्र खत आहे. त्यातच असलेले दुसरे घटक कॅल्शियम सल्फेट (प्लास्टर ऑफ पॅरिस, गणपती मूर्ती) याचे विघटन हे कॅल्शियम कार्बोनेट मध्ये होते की जे गणेश मूर्ती बनवितात त्या माती सारखेच दिसते, परंतु त्याचे पाण्यात हळूहळू विघटन होऊ शकते.
अशा तऱ्हेने गणेश मूर्ती बनवण्यात वापरण्यात येणारे प्लास्टर ऑफ पॅरिस (कॅल्शियम सल्फेट) आशा पाण्यात अविघटीत पदार्थाचे विघटित पदार्थ कॅल्शियम कार्बोनेट मध्ये सहज होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेद्वारे पर्यावरणपूरक श्रीगणेश विसर्जन शक्य आहे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. ए. बी. जैन यांनी अमळनेरच्या नागरिकांना केले.
अशा पद्धतीने आपण घरोघरी श्रीगणेश विसर्जन हे खतात रूपांतर करून पर्यावरणास प्रदूषण मुक्त करण्यास मदत करू शकतो, असे मत रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. नीलेश पवार यांनी केले. या सर्व उपक्रमासाठी खानदेश शिक्षण मंडळ प्रताप महाविद्यालय संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी या उपक्रमासाठी प्रोत्साहित केले व या कार्यक्रमाचे नियोजन रसायनशास्त्र विभागातील प्रा. पराग पाटील (उपप्राचार्य) व प्रा. डॉ. मिलिंद ठाकरे यांनी केले. या कार्यक्रमास विभागातील प्रा. डॉ. तुषार रजाळे, प्रा संतोष दिपके, प्रा. डॉ. रवी बाळस्कर, प्रा. डॉ. विवेक बडगुजर, प्रा. डॉ. अमोल मानके, प्रा. रामदास सुरळकर , प्रा. हर्षल सराफ, माजी प्राध्यापक डॉ. जयेश गुजराथी व डॉ. प्रकाश शिरोडे हे देखील उपस्थित होते.