रोहित पवार यांना कंपनी बंद करण्याची नोटीस..
घाणेरड्या राजकारणाविरोधात लढत राहू – रोहित पवार..

24 प्राईम न्युज 29 Sep 2023
सातत्याने आरोप करणारे राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांची बारामती अॅग्रो ही कंपनी ७२ तासांत बंद करा, अशी नोटीस प्रदुषण नियंत्रण मंडळाने रात्री २ वाजता कंपनीला बजावली आहे. दोन राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून मनात कुठला तरी द्वेष ठेवून कंपनीच्या एक विभागावर कारवाई करण्यात आली आहे. हे घाणेरडे राजकारण असून या विरोधात लढत राहणार असल्याची भूमिका रोहित पवार यांनी जाहीर केली आहे.
- वाढदिवसाचं ‘गिफ्ट’: जनता रिटर्न गिफ्ट देईल “आपण सत्याच्या बाजूने आहोत आणि केवळ राजकीय सुडापोटी ही कारवाई होत असल्याने माझ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबाने काळजी करण्याची गरज नाही. माझ्या वाढदिवसानिमित्त ‘गिफ्ट’ दिल्याबद्दल सरकारचे आभार मानतो. परंतु राज्यातली युवा आणि जनता सरकारला नक्कीच ‘रिटर्न गिफ्ट’ देईल, ही खात्री आहे, ” असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.
बारामती येथील बारामती अॅग्रो प्लांट हा मोठा प्लांट आहे. रोहित पवार हे या कारखान्याचे संचालक आहे. शेती संबंधित अनेक उत्पादने येथे ठिकाणी तयार होत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हा कारखाना वादात सापडला आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाने मध्यरात्री २ वाजता रोहित पवार यांना नोटिस पाठवून हा कारखाना बंद करण्याच्या सूचना केल्या आहे. याबाबत ‘एक्स’ अकाउंटवर रोहित पवार
म्हणाले, “राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्यासांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून पहाटे दोन वाजता राज्य शासनाच्या एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली.