अमळनेरात ईद -ए -मिलादुन्नबी ची विशाल शोभायात्रा शांततेत संपन्न. हजारोंचां सहभाग..

अमळनेर (आबिद शेख)
अमळनेर येथे पैगंबर मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त ईद-ए-मिलाद मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली, यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी मिरवणूक काढून ईदगाह मैदानात नमाज अदा केली, यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. ईद-ए-मिलाद 28 तारखेला होणार होती, मात्र त्याच दिवशी

गणेश विसर्जन असल्याने शहरातील मुस्लिम नागरिकांनी औदार्य दाखवत मिरवणूक काढण्याचे पत्र प्रशासनाला दिले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी 29 रोजी मुस्लीम लोकांनी मिरवणूक काढली, त्यात कसाली मोहल्ला, जुम्माची नमाज अदा केल्यानंतर शाहआलम नगर, इस्लामपुरा, आंदर पुरा, बाहेर पुरा, झामी चौक, मिलचाल, जपान जिन आदी ठिकाणच्या मुस्लिमांनी मिरवणूक काढली. , गलवडे चाळ , बंगाली फाईल , आदी ठिकाणांहून 3 वाजता कसाली मोहला परिसरातून मिरवणूक काढण्यात आली , यामध्ये तरुण आणि लहान मुलांचा , तसेच सर्व वयोगटातील लोकांचा समावेश होता सर्व लोक हातात झेंडे घेऊन “नाऱये तकबिर अल्लाहू अकबर ” ची घोषणा देत ईदगाहकडे निघाले होते. इदगाह मैदानावर सर्वांनी अस्र ची नमाज अदा केली, सुमारे पाच ते सात हजार लोक मिरवणुकीत सामील झाले, पोलिसानी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.