गणपती विसर्जन मिरवणूक दिलेल्या वेळेत पूर्ण न केल्याप्रकरणी एरंडोल येथील १८ गणेश मंडळांच्या अध्यक्षासह सदस्यांवर गुन्हे दाखल.

एरंडोल( कुंदन ठाकुर)
एरंडोल येथील १८गणेश मंडळाचे अध्यक्ष व मंडळातील सहभागी सदस्यांनी गणपती विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी रात्री बारा वाजे नंतर वाद्य बंद करण्यासाठी पोलिसांनी दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष करून गणपती विसर्जन मिरवणूक दिलेल्या वेळेत पूर्ण न करता रात्री बारा वाजे नंतर देखील मिरवणुकीमध्ये ढोल ताशे बँड व इतर पारंपारिक वाद्य २९ सप्टेंबर रोजी पहाटे साडेचार वाजेपर्यंत वाजवून पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून येथील सार्वजनिक १८ गणेश मंडळाचे अध्यक्षांसह मंडळातील सहभागी सदस्यांवर शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
२८ सप्टेंबर रोजी एरंडोल येथे सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने गणपती विसर्जन मिरवणूक करण्यात आली सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. क्रमांक एक ते अठरा सार्वजनिक मंडळे गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले त्यातील सोडाव्या क्रमांकाचे हरीपुरी गणेश मित्र मंडळ अमळनेर दरवाजा एरंडोल यांनी कोणतेही वाद्य न वापरता फक्त गणेश मूर्ती विसर्जनात सहभागी झाले. विसर्जन मिरवणुकीतील जय गुरु व्यायाम शाळा, सावता माळी गणेश मंडळ, बालवीर गणेश मंडळ, जय हिंद गणेश मंडळ, बालमित्र गणेश मंडळ, माहेश्वरी मंडळ, नम्रता गणेश मंडळ, अखिल ब्रह्म वृंद नवयुवक गणेश मंडळ, सर्वोदय गणेश मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज मंडळ गांधीपुरा, ज्ञानदीप मित्र मंडळ, नागराज मित्र मंडळ ,चौक गणेश मंडळ, संताजी मित्र मंडळ, जय बजरंग मित्र मंडळ, श्रीराम गणेश मंडळ, बालाजी मित्र मंडळ. या मंडळाचे अध्यक्ष यांनी विसर्जन मिरवणूक किती वाजता संपवावे विसर्जन मिरवणुकीमध्ये कशाप्रकारे वर्तन करावे याबाबत त्यांना सी आर पी सी १४९ नोटीस प्रमाणे लेखी सूचना देण्यात आल्या होत्या या मंडळांनी पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे तसेच महाशय जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशाचे उल्लंघन केले.