गणेश भक्तांवर दाखल गुन्ह्यांसाठी मोफत वकिली सहाय्य..

एरंडोल ( कुंदन ठाकुर)आता नुकतेच 28 /09/2023 रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाचे रॅली मिरवणुका निघाल्या होत्या. काही गणेश भक्तांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत म्हणून अशा दाखल गुन्ह्यांसाठी कायदेविषयक मोफत सल्ला तसेच कायदेविषयक मोफत सहाय्य देण्यासाठी एरंडोल न्यायालयातील एडवोकेट महेश ओंकारनाथ कांबरे तसेच एडवोकेट ज्ञानेश्वर बळीराम महाजन हे पुढे आलेले आहेत .सदर गणेश भक्तांवरील दाखल झालेले गुन्ह्यात जामीन देण्यासाठी गणेश भक्तांनी जामीनदाराच्या सातबारा उतारा पासपोर्ट साईज फोटो तसेच आधार कार्ड संबंधित वकिलांकडे जमा करावयाचे आहेत. यासाठी एडवोकेट महेश काबरे तसेच एडवोकेट ज्ञानेश्वर महाजन यांनी सांगितले की हे सदर गणेश भक्तांवरील दाखल गुन्ह्यात कामकाज पाहण्यासाठी कोणतीही फी अथवा खर्च घेणार नाहीत संपूर्ण मोफत कायदेविषयक सल्ला व न्यायालयीन कामकाज पाहण्यात येईल असे कळवलेले आहे ज्या ज्या गणेश भक्तांवर गुन्हे दाखल आहेत त्यांनी एडवोकेट महेश ओंकारनाथ काबरा मोबाईल नंबर 9545 072800 तसेच एडवोकेट ज्ञानेश्वर बळीराम महाजन मोबाईल नंबर 9764858827 या नंबर वर संपर्क साधावायचा आहे असे कळवलेले आहे.