एरंडोल प्रांताधिकारी यांच्या आदेशाने आई वडील व जेष्ठ नागरिकांना उदरनिर्वाह करण्यास नकार दिल्याने मिळवून दिला निर्वाह भत्ता.

एरंडोल ( कुंदन ठाकुर) एरंडोल प्रांताधिकारी मनिषकुमार गायकवाड यांनी २२ सप्टेंबर २०२३ रोजी दिलेल्या आदेशात आई,वडील, जेष्ठ नागरीकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी असलेल्या नियमानुसार तिन निर्णय पारित केले यात एका आईला व एका परिवारातील आई वडील व आजोबांना निर्वाह भत्ता देण्याचे आदेश दिले.तर एका प्रकरणात अर्जदार वडील निवृत्त शिक्षक असुन त्यांच्या कडे शेती असल्याने त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की एरंडोल प्रांताधिकारी मनिषकुमार गायकवाड यांच्या कडील प्रकरणात वजाबाई राजधर सरदार (वय ७०) रा. तामसवाडी ता.पारोळा यांना चार मुल असुन त्यातील एक मुलगा दिलीप राजधर सरदार रा.भोपाळ हा त्यांचा सांभाळ करीत नसल्याने त्याला आई वजाबाई सरदार यांना दरमहा १५००/- रु.निर्वाह भत्ता देण्याचे आदेश दिले असुन दुसऱ्या एका प्रकरणात रमेश सुपडू पाटील (वय ७५),सौ.सरला रमेश पाटील ( वय ६५ ) व लक्ष्मीबाई सूपडू पाटील यांचा एकुलता एक मुलगा व नातू उमेश रमेश पाटील हा त्यांचा सांभाळ व आजारपणाचा खर्च करीत नसल्याने त्याने प्रत्येकी २५०० रू.दरमहा निर्वाह भत्ता मंजुर करण्यात आला आहे तर तिसऱ्या प्रकरणात दयाराम मोतीराम पाटील (वय ७४) रा.पारोळा यांनी त्यांचा मुलगा अशोक दयाराम पाटील यांच्या विरुद्ध निर्वाह भत्ता मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता परंतु दयाराम पाटील हे निवृत्त शिक्षक असुन त्यांना दरमहा निवृत्ती वेतन मिळते व त्यांच्याकडे शेती असल्याने त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला.
एका पत्रकाद्वारे प्रांताधिकारी मनिषकुमार गायकवाड यांनी मुले,मुली,नातेवाईक हे जर आई वडील आजी आजोबा यांचा सांभाळ करीत नसतील किंवा अन्न,वस्त्र, औषधोचारासाठी खर्च करीत नसतील तर त्यांना जेष्ठ नागरिक अधिनियमा नुसार जेष्ठ नागरिकांना अध्यक्ष,जेष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण तथा उपविभागीय अधिकारी एरंडोल यांच्याकडे अर्ज करून दाद मागता येईल असे कळविले आहे.