ट्रॅक्टर ट्रॉली मधील चोरटी वाळू उपसून ट्रॅक्टर घेऊन पलायन केल्याची घटना,
वाळू माफियांच्या सात ते आठ जणांकडून महसूल पथकाला मारहाण व जीवे मारण्याची धमकी..

0

.
प्रतिनिधी (कुंदन ठाकुर)
एरंडोल येथील महसूल यंत्रणेतर्फे अवैध वाळू भरलेले ट्रॅक्टर ट्रॉली सह कारवाईसाठी एरंडोल पोलीस स्टेशनला नेले जात असताना चोरटक्की गावाजवळ बोलेरो गाडी आडवी करून आडवी करून समाधान सोनवणे व त्यांच्या सात ते आठ जणांनी महसूल यंत्रणेच्या पथकाला धक्काबुक्क्यांनी मारहाण केली तसेच शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. यावेळी ट्रॅक्टर ट्रॉली मधील वाळू उपसून ट्रॅक्टर घेऊन चोरट्यांनी पलायन केले. या घटनेची रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास तहसीलदार सुचिता चव्हाण यांना माहिती मिळताच त्यांनी स्वतः संपूर्ण टीम व पोलिसांसह खेडी गावात आरोपींचा शोध घेतला त्यावेळी तेथे वाढू भरणारे तीन मजूर त्यांच्या सामानासह आढळून आले. रात्रभर चोरट्यांना शोधण्यासाठी शोध मोहीम राबविण्यात आली. अखेर ती गाडी मालकासह ताब्यात घेण्यात आली पोलीस स्टेशनला समाधान सोनवणे ट्रॅक्टर चालक व श्रीराम गवळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला .वाळू माफियांची ही वाढती मुजोरी महसूल यंत्रणेला मोठी डोकेदुखी ठरत आहे ” धरला तर चावत सोडत ते पळत”अशी अवस्था वाळू चोरी रोखण्यासंदर्भात महसूल यंत्रणेची झाली आहे.
अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी एरंडोल महसूल यंत्रणेतर्फे पथके नेमण्यात आलेले आहेत तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार किशोर शिवाजी माळी, सलमान तडवी, सुधीर मोरे सुरेश कटारे अतुल तागडे बालाजी लोंढे श्रीकांत कासूंदे, यांच्या पथकाने शनिवारी रात्री एक वाजेच्या सुमारास कांताई बंधारा कढोली येथे एक बिना नंबरचे वाळू भरलेले ट्रॅक्टर पकडले ट्रॅक्टर चालकाला नाव विचारले असता त्याने सागर श्रीराम गवळी, असल्याचे व ट्रॅक्टर मालकाचे नाव श्रीराम विष्णू गवळी राहणार खेडी खुर्द असे असल्याचे सांगण्यात आले. सदर ट्रॉलीमध्ये जवळपास एक ब्रास वाळू भरली होती सदर ट्रॅक्टर हे कारवाई साठी एरंडोल पोलीस स्टेशनला नेतअसताना चोरटक्की गावाजवळ एक बोलेरो गाडी सदर ट्रॅक्टर च्या पुढे आडवी करण्यात आली त्यातून समाधान सिताराम सोनवणे हा गाडीतून उतरला त्याच्यासोबत सात ते आठ लोक कुऱ्हाड लाकडी दांडा असे घेऊन गाडीतून उतरले त्यांनी नायब तहसीलदार किशोर माळी व त्यांच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली व जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच पथकाने पकडलेल्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. यानंतर समाधान सोनवणे याने ट्रॅक्टर ट्रॉली मधील वाळू उपसून ट्रॅक्टर घेऊन त्यातून पडून गेला..
त्यांनी शासकीय कामात अडथळा आणला म्हणून एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश पाटील, अनिल पाटील मिलिंद कुमावत अखिल मुजावर हे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!