मुलगी बघायला आले व लग्न उरकवून घेतले. मनीयार बिरादरी ने केले कौतुक व समाजाला केले आवाहन.
-खरी ईद ए मिलाद याला म्हणतात – फारुक शेख.

जळगाव ( प्रतिनिधि )
वरणगाव येथील शेख गफूर हे त्यांचा मुलगा नावे शेख शाकीर याच्यासाठी जळगाव येथील तांबापुर मधील शेख लाल यांची मुलगी बुशराबी हिला बघण्यासाठी आले दोघे नातेवाईक परिचित असल्
याने रविवार रोजी साखरपुडा ची तयारी चालू असताना अडावद चे अर्षद आली जे नवरदेव चे मेव्हणे आहेत त्यांनी तसेच वरणगाव चे शेख अजिज, आबीद आमद, शेख सत्तार, आबिद आमीर,व सय्यद शाहिद यांनी पुढाकार घेऊन साखरपुडा न करता डायरेक्ट लग्न लावून घ्या यासाठी प्रयत्न केले असता शेख लाल ज्यांना ७ मुली आहेत त्यापैकी ३ मुलींचे लग्न झाले होते व ४थ्या मुलीसाठी हे स्थळ आल्याने त्यांनी सुद्धा गांभीर्यपूर्वक विचार करून आपल्या पत्नीशी सल्लामसलत करून लग्नाला होकार दिला.
सदर बाब मनियार बिरादरी च्या तडजोड बैठकीत येताच प्रत्यक्ष त्या निकाह मध्ये जाऊन अध्यक्ष फारुक शेख यांनी दोन्ही कुटुंबीयांचे अभिनंदन करून कौतुक केले. समाजाच्या प्रत्येक घटकाने अनुकरण करावे असे हे निकाह आहे. ईद ए मिलाद ची हीच खरी शिकवण अंतिम प्रेशितांनी दिली आहे असे त्यांनी उपस्थितांना सांगितले.

सदरचे लग्न (निकाह) दुपारी ३ वाजता मस्जिद ए इब्राहिम, शिरसोली नाका येथे काझी कदिर बशीर पटेल यांनी उस्मान बिलाल शेख यांच्या वकालत ने व शेख सत्तार महमूद,वरणगाव व साजिद खान अरमान खान पारधी यांच्या साक्षीने हा निकाह लावला.
या निकाह मध्ये जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख व उस्मानिया चे समाज सेवक समीर शेख यांची विशेष उपस्थिती होती.
तसेच वर आणि वधू कडील प्रत्येकी 10 लोकांची उपस्थिती होती.
अशा प्रकारे अत्यंत साध्या व फक्त खजूर मध्ये हे लग्न पार पडले.
मन्यार बिरादरी तर्फे वर शाकीर व वधु बुशराबी तसेच त्यांचे पालक शेख गफूर व शेख लाल यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले व त्यांनी चांगले कार्य केल्याबद्दल त्याचा गौरव सुद्धा करण्यात आला.