दाऊद आयएसआयचा मानद अतिरिक्त महासंचालक !

24 प्राईम न्यूज 1Oct 2023 भारतात बॉम्बस्फोट घडवून हजारो निरपराध लोकांचे प्राण घेणारा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमला पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ने मानाचे पान दिले आहे. आयएसआयच्या मानद अतिरिक्त महासंचालकपदी दाऊदची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आयएसआयसाठी त्याने केलेल्या कारवायांचे बक्षीस म्हणून ६८ वर्षीय दाऊदला हे विशेष पद देऊन त्याची खातीरदारी केल्याचे गुप्तचर यंत्रणांतील सूत्रांनी सांगितले.भारतात हेरगिरीसाठी दाऊदचे नेटवर्क दाऊदचे मुंबई, अहमदाबाद व अन्य शहरात नेटवर्क आहे. याचा वापर करण्याचा परवाना दाऊदने हेरगिरीसाठी आयएसआयला दिला आहे. मुंबईतील अनेक बिल्डर्स दुबई किंवा नेपाळमधून पाकिस्तानात जातात. त्यासाठी पाकिस्तानी पासपोर्ट वापरतात. हा पासपोर्ट त्याना शकील पुरवतो. नुकतेच दाऊद टोळीने त्याच्या हस्तकाच्या सहाय्याने हॉटेल मरीन प्लाझा ताब्यात घेण्याबाबत हालचाली सुरू केल्या, तर त्याच्या टोळीने वडाळा येथे २८ एकर भूखंड बेनामी बिल्डरच्या नावाने खरेदी केला. हा बिल्डर दादरचा आहे. मुंबईतील बिल्डर क्षेत्रात चिनी लोकानी मोठी गुंतवणूक सुरू केली. त्यातील काहीचा संबंध दाऊद टोळीशी असल्याचे मानण्यात येत आहे.