अलफैज उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्यु. काॅलेज अमळनेर येथे “स्वच्छता पंधरवडा” अभियानातंर्गत ‘ एक तारीख एक तास श्रमदान ‘ हा उपक्रम उत्साहात संपन्न..

अमळनेर(प्रतिनिधि,) अलफैज उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्यु. काॅलेज अमळनेर येथे दि.01/10/2023 वार- रविवार रोजी ” स्वच्छता पंधरवडा ” अभियानातंर्गत ‘ एक तारीख एक तास श्रमदान ‘ हा उपक्रम बालाजी पुरा शाळा परिसर, तसेच न.पा उर्दू शाळा क्र.6 मधे राबविण्यात आला.
तसेच तंबाखू मुक्त रॅली काढण्यात आली. तद्नंतर इयत्ता 5वी ते इ.12वी च्या सर्व विद्यार्थिनींनी आणि शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्म चा-यांनी मुख्याध्यापिका सौ. नसीम शेख इब्राहिम यांच्या नेतृत्वाखाली तंबाखू मुक्ती साठी सामुहीक शपथ घेतली .तसेच शिक्षक अस्लम काझी सर, जाविद मिर्जा यांनी स्वच्छतेचे महत्व सांगून तंबाखू पासून होणा-या रोगांची माहिती दिली .त्यासाठी काय उपाययोजना करता येईल म्हणून व्यसनमुक्त भारत, तंबाखू मुक्तभारत हे या मोहिमेद्वारेच शक्य आहे . हे पटवून दिले. उपक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यात आला.