पंतप्रधान मोदींनी एक तास स्वच्छतेसाठी केलेल्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद.. -सुमारे १८ टन कचरा साफ.
-मंत्री अनिल पाटील देखील स्वच्छ अभियानात सहभागी बस स्थानक व धुळे रोड परिसरात केली स्वच्छता.

अमळनेर (प्रतिनिधि) पंतप्रधान मोदींनी एक तास स्वच्छतेसाठी केलेल्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून सुमारे १८ टन कचरा साफ करण्यात आला. मंत्री अनिल पाटील देखील स्वच्छ अभियानात सहभागी होऊन बस स्थानक व धुळे रोड परिसरात स्वच्छता केली.
अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी प्रत्येक प्रभागात एक या प्रमाणे १७ ठिकाणी केंद्र नमन नेमून घंटा गाड्या ठेवल्या होत्या. तसेच बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. माती,प्लस्टिक पिशव्या ,रिकाम्या बाटल्या ,खाली पाऊच व कचरा झाडून गोळा करण्यात आला. तसेच गवत व झुडुपे काढण्यात आले. धर्माधिकारी फौंडेशन तर्फे देखील आर के नगर ते महाराणा प्रताप चौक अशी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सहा ट्रॅक्टर कचरा गोळा करण्यासाठी स्वतंत्र ठेवण्यात आले होते. सर्व मिळून सुमारे १८ टन कचरा गोळा झाला. हा कचरा गावाबाहेरील कचरा डेपोत जमा करण्यात येऊन त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे.
यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील , उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड , बांधकाम अभियंता डिंगबर वाघ ,अमोल भामरे , विद्युत अभियंता प्रशांत ठाकूर , पाणी पुरवठा अभियंता प्रवीण बैसाणे , आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण ,संतोष बिऱ्हाडे ,हैबत पाटील ,वसुली विभागाचे सोमचंद संदानशीव ,प्रसाद शर्मा ,मुकादम आणि सफाई कर्मचारी हजर होते.
तालुक्यातील मंगरूळ येथे देखील ग्रामपंचायत ,स्व अंबर राजाराम पाटील माध्यमिक विद्यालय , वस्ती शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी ग्रामविकास अधिकारी संजीव सैंदाने , मुख्याध्यापक प्रकाश पाटील ,भटू पाटील ,अशोक सूर्यवंशी , प्रभूदास पाटील ,संजय पाटील , राजेंद्र पाटील , सुषमा सोनवणे , सीमा मोरे , खुशाल पाटील ,प्रदीप पाटील ,सुदर्शन पवार व विद्यार्थ्यांनी साफसफाई केली.